वसंत मोरे, बारामती: मास्क मुक्त महाराष्ट्र व्हावा यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केलं होतं. त्यावर आता अजित पवारांनी असं म्हटलं आहे की, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे एकाच पक्षातील 2 मंत्री एकाच प्रश्नाला वेगवेगळी उत्तरं देत असल्याचं दिसून येत आहेत.
ADVERTISEMENT
आज (29 जानेवारी) सकाळी पुण्यात देखील मास्क मुक्तीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आजच कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र मास्क मुक्ती बाबत चर्चा झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अजित पवारांना याच प्रश्नाबाबत पुन्हा विचारणा केली असता मास्क मुक्तीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. असं अजित पवार यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ते इंदापूरमध्ये बोलत होते. पण त्यामुळे मंत्रिमंडळात एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार इंदापूर येथील लोणी देवकर एमआयडीसीत आर्यन पॅम्स अँड इन्व्हायरो सोल्यूशन कंपनीत 18 अग्निशमन गाड्यांचे लोकार्पण केले.
आर्यन पंपने बनविलेल्या क्यूक रिस्पॉन्स व्हीकल अग्निशमन दलाच्या गाड्याची यावेळी अजित पवारांनी पाहणी केली. आर्यन कंपनीने 18 फायर आणि रेस्क्यू व्हीकल बनविल्या आहेत. या गाड्या राज्यातील 18 महानगरपालिकाना देण्यात येणार आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण अजित पवार, विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झालं.
महाराष्ट्र खरंच ‘मास्क मुक्त’ होणार आहे का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर
‘महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका’
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही याबाबत ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मास्क हे कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगलं शस्त्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका.’ असं स्पष्टीकरण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
पाहा मास्क मुक्त महाराष्ट्राबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले:
‘मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हणालो नाही. मला एवढंच सांगायचं की, इग्लंड, डेन्मार्क, युरोपियन देशांमध्ये झालेल्या निर्णयावर आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्या देशांनी कोणत्या वैज्ञानिक आधारावर निर्णय घेतले याबद्दल केंद्राच्या टास्क फोर्स आणि राज्याच्या टास्क फोर्स माहिती विचारावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला केली होती.’
‘मास्क मुक्ती इतकाच विषय नाही. त्यांनी बरेच निर्बंध कमी केले आहेत. त्याबद्दल आयसीएमआरने मार्गदर्शन करावं. मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे. याबद्दल आम्ही केंद्राला आणि आयसीएमआरला पत्र लिहिणार आहोत. युरोपियन देशांमध्ये कोविडसह आयुष्य हे धोरण स्वीकारलं आहे. त्यांनी कोणत्या पद्धतीने नियोजन केलं आहे. त्याबद्दल टास्क फोर्सने मार्गदर्शन करणं आवश्यक आहे,’ असं टोपे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT