मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत होणारी चिंताजनक वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आर्थिक दंड ठोठवण्यासाठी क्लिन-अप मार्शल्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतू मुंबईतील काही भागांत मार्शल्स आणि जनतेमध्ये वादाचे प्रसंग समोर आले आहेत. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी क्लिनअप मार्शल्सना लोकांनी भांडू नका असा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – पुण्यात पुन्हा संचारबंदी, शाळा-महाविद्यालयंही बंद राहणार
“जी लोकं मास्क घालत नाहीयेत त्यांच्याशी हुज्जत घालू नका किंवा त्यांच्याशी भांडू नका. एखादी व्यक्ती चुकीचं वागत असेल तर त्याचा फोटो किंवा व्हिडीओ घ्या आणि तुमच्या वरिष्ठांना दाखवा. सध्या सामान्य जनताही सततच्या निर्बंधांमुळे त्रासलेली आहे. त्यांना या मोहीमेचं उद्दीष्ठ काय आहे हे समजावून सांगा, पैसे गोळा करणं हे याचं ध्येय नाहीये. लोकांनी मास्क घालून घराबाहेर पडावं हा संदेश लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. मार्शल्स जेव्हा लोकांशी हुज्जत घालतात तेव्हा महापालिकेचं नाव बदनाम होतं. त्यामुळे काम करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करावं.” प्रसारमाध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी माहिती दिली.
यावेळी बोलत असताना पेडणेकर यांनी मार्शल्स यांनी कोणत्याही लोकांसोबत भांडणात पडू नका. एखादा व्यक्ती नीट वागत नसेल तर त्याची पोलिसांमध्ये तक्रार द्या आणि आपल्या वरिष्ठांना कळवा असं आवाहन केलं आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सात वाजता संवाद साधणार आहेत.
अवश्य वाचा – धक्कादायक ! अमरावतीमधील ६० टक्के परिसर कोरोनाबाधित
ADVERTISEMENT