मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली असून त्याच्यावरचा खटला सध्या डोमनिकामध्ये सुरू आहे. भारतातल्या PNB अर्थात पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे दोघेही कर्जबुडवे देशाबाहेर पळाले. त्यानंतर मे महिन्यात मेहुल चोक्सीला डोमनिकामध्ये अटक कऱण्यात आली. मेहुल चोक्सी पकडला गेला तेव्हा त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका होती. आता बार्बरानेच इंडिया टुडेशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह चर्चेत मेहुल चोक्सीबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
ADVERTISEMENT
बार्बरा ही माझी गर्लफ्रेंड आहे असा दावा मेहुल चोक्सीने केला होता. तसंच तिच्यावर आरोपही करण्यात आले आहेत. त्यानंतर आता इंडिया टुडेशी बोलताना बार्बराने अनेक खुलासे केले आहेत.
मी मेहुलची चांगली मैत्रीण होते. त्याने मला त्याची ओळख राज अशी करून दिली होती. मेहुलने मला गिफ्ट म्हणून डायमंड रिंग आणि ब्रेसलेट दिले होते पण ते खोटे निघाले
बार्बरा, मेहुलची कथित गर्लफ्रेंड
काय म्हणाली आहे बार्बरा?
बार्बरा म्हणाली की मेहुल चोक्सीने मला त्याचं नाव राज आहे असं सांगितलं होतं. राज म्हणून त्याने स्वतःची ओळख करून दिली होती. गेल्यावर्षी मेहुल चोक्सी डोमनिकामध्ये आला होता तेव्हा त्यांची ओळख झाली. सुरूवातीला त्याने माझ्याशी मैत्री वाढवली आणि मग तो माझ्यासोबत फ्लर्ट करू लागला. त्याने मला हिरे आणि ब्रेसलेटही गिफ्ट केले पण ते सगळे खोटे निघाले. मेहुल चोक्सीने माझ्यावर जो आरोप केला आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही. माझा त्या आरोपांशी काहीच संबंध नाही. मेहुलच्या कुटुंबीयांनी या सगळ्या प्रकरणात मला विनाकारण ओढलं आहे. जेव्हापासून हे सगळं प्रकरण घडलं आहे तेव्हापासून मी आणि माझं कुटुंब प्रचंड तणावात आहे. बार्बराने एक व्हॉट्स अॅप चॅटही इंडिया टुडेला पाठवला या चॅटमध्ये मेहुल चोक्सीचा नंबर बार्बराने Raj New या नावाने सेव्ह केला आहे. या चॅटमध्ये मेहुल बार्बराला विनवण्या करतो आहे आणि समजावतो आहे.
बार्बरा आणि मेहुल चोक्सी यांच्यातला संवाद. या संवादात दिसून येतं आहे की बार्बराने मेहुलचा नंबर राज न्यू या नावाने सेव्ह केला आहे.
आणखी काय म्हणाली आहे बार्बरा?
मेहुल चोक्सी मला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला होता. तिथे त्याने मला किस करण्याचा प्रयत्न केला. मेहुल जे काही अपहरणाचे दावे करतो आहे त्यात काहीही तथ्य नाही. मी ठरवलं असतं तर माझ्याकडे असे पर्याय आले होते की मी त्याचं अपहरण करू शकले असते. पण मी तसं मुळीच केलं नाही. बार्बराने काही गुंडाच्या मदतीने माझं अपहरण केलं असा दावा मेहुल चोक्सीने केला होता. मात्र बार्बराने हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
मेहुल चोक्सीने बार्बरावर काय आरोप केले?
मेहुल चोक्सीला डोमनिका पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. तसंच मेहुलने आपण दोषी नसल्याचंही म्हटलं आहे. तसंच बार्बरा माझ्या शेजारी राहात होती आम्ही दोघे वॉकला जात होतो असंही सांगितलं. 23 मे रोजी मला बार्बराने एके ठिकाणी बोलावलं होतं तिथे मी तिला घ्यायला जायचं होतं. मात्र मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथे 8-10 लोक जमले होते. त्यांनी मला मारहाण केली. त्यावेळी बार्बराने मला वाचवण्याचा जराही प्रयत्न केला नाही. तिने माझं अपहरण केलं असंही आपल्या तक्रारीत मेहुल चोक्सीने म्हटलं आहे. मात्र बार्बराने हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
ADVERTISEMENT