कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामध्ये देखील मेट्रोने आपल्या कार्याचा वेग कायम ठेवत आता पर्यंत अनेक कार्य पूर्ण केले असून या मध्ये आणखी एक महत्वाचा पार पडला आज रिच २ मार्गिकेवरील (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक) मेट्रो स्टेशन दरम्यानच्या झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो ट्रेनचे यशस्वी रित्या ट्रायल रण पूर्ण करण्यात आले. डिसेंबर २०२१ पर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक दरम्यान प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून आजचे हे ट्रायल रन त्याची एक सुरुवात आहे.
ADVERTISEMENT
या १ किमीच्या या मार्गिकेवर २० किमी प्रति तास गतीने ट्रायल रन घेण्यात आले. या मार्गिकेवरील सिग्नलिंग,ओएचई(विद्युत खांब) आणि ट्रॅकचे कार्य पूर्ण झाले असल्याने सदर ट्रायल रन पूर्ण करण्यात यश आले व उर्वरित कार्य महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात पूर्ण केल्या जात आहे. या ट्रायल रनची चाचणी पूर्ण केल्या बद्दल डॉ. दीक्षित यांनी संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.
२० मजली झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशनच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यातुन ट्रेनचे संचालन होणार आहे. झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे अनोखे मास स्प्रिंग सिस्टम (एमएसएस) बसविण्यात आले आहे. सदर मास स्प्रिंग सिस्टम हे मेट्रो रेल्वे गाडीच्या हालचाली मुळे उध्दभवणारे कंपन थांबवते. वायाडक्ट येथे अश्या प्रकारचे फ्लोटिंग ट्रॅक स्लॅबवर यंत्रणा बसविणारे नागपूर प्रकल्प पहिला मेट्रो प्रकल्प आहे.
महा मेट्रो झिरो माईल फ्रिडम पार्क व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचे विकास कार्य करत असून, झिरो माईल स्टेशनच्या वरील भागात इलेक्ट्रॉनिक वस्तूचे विशेष मार्केट तयार करीत असून या करिता निविदा मागविण्यात आल्या आहे, येथे २१ दुकाने तयार केली जातील तसेच या मार्केटच्या वर २.४० लाख चौ.फूट जागेवर सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर व्यावसायिक परिसर तयार करण्यात येणार आहे.
स्टेशनला फ्रिडम पार्क भारतीय स्वातंत्र्य लढा व भारतीय संरक्षण दलाची अशी थीम देण्यात येणार आहे. १८५७ व १९४७ लढ्यातील विशेष घडामोडी या स्टेशन परिसरात दर्शविल्या जाईल. या दोन्ही महत्त्वपूर्ण घटनांचा शहरात ऐतिहासिक वारसा आहे. नागपूर व सिव्हिल लाईन्स परिसरातील घटना या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. कस्तुरचंद पार्क स्टेशनच्या लगत मेट्रो प्रवाश्याकरिता दु-मजली पार्किंग निर्माणाधीन आहे.
रिच २ ही अतिशय महत्वपूर्ण मार्गिका असून या मार्गिकेवर विधान भवन,रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि कस्तुरचंद पार्क असे महत्वाचे ठिकाण आहे तसेच झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन सिव्हिल लाईन्स परिसरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यरत आहे ज्यांना या परिसरात मेट्रो सेवा सुरु झाल्यास लाभ होणार आहे.
ADVERTISEMENT