राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सध्या त्यांच्या तीन दिवसीय व्हायरल दौऱ्यामुळे चांगलंच ट्रोल होत आहेत. गुरुवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून मंत्री तानाजी सावंत यांचा दिवशीय दौरा जाहीर करण्यात आला होता. त्यात 26 आणि 27 ऑगस्ट दरम्यान या दौर्यात मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातील कात्रज भागातील त्यांच्या घरून निघून कात्रजमधील बालाजी नगर भागातील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाणार आणि तिथून पुन्हा त्यांच्या घरी परतणार एवढा प्रवास करणार आहेत. त्यामुळे तानाजी सावंत मोठ्याप्रमाणात ट्रोल होत आहेत.
ADVERTISEMENT
घर ते कार्यालय आहे 5 मिनिटाचा रस्ता
तानाजी सावंत यांचा पुण्यातील कात्रज येथील निवासस्थान ते बालाजी नगर येथील कार्यलय दरम्यान फक्त 5 मिनिटाचा अंतर आहे. दोन दिवस आरोग्यमंत्री घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतकाच प्रवास करून दौरा प्रसिद्ध झाला. यामुळे त्यांच्या दौऱ्याची मोठी चर्चा सुरु आहे. विरोधक त्यांचा प्रसिद्ध झालेल्या दौऱ्याची प्रत व्हायरल करत सावंतांना ट्रोल करत आहेत.
मंत्र्यांची बैठक, सभा, पत्रकार परिषद असल्याकस दौरा प्रसिद्ध केला जातो. त्यासाठी मंत्र्यांचा मोठा फौजफाटा तैनात असतो. या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असतो. मात्र घरापासून कार्यालयपर्यंत आणि कार्यालयापासून घरापर्यंत जाण्यासाठी दौरा जाहीर करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कारणामुळे सावंतांवर मोठी टीका होत आहे. “तानाजी सावंत दौरा करतायत की गल्ली मधे गणपतीची वर्गणी जमा करत फिरतायत.तेच कळत नाही.” असा टोमणा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांनी लगावलाय.
सतत चर्चेत असतात तानाजी सावंत
मागील काही वर्षांपासून तानाजी सावंत हे या ना त्या कारणामुळं चर्चेत असतात. पूर्वी राष्ट्रवादीत असणारे सावंत सेनेत आल्यापासून मातोश्रीच्या अगदी जवळ गेले होते. महायुतीच्या काळात ते पहिल्यांदा आमदार आणि मंत्री झाले होते. त्यावेळी पुण्यातील धरण फुटलं होतं. धरण खेकड्यांनी फोडलं, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. तर नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. म्हणून त्यांनी बंड करत शिंदे गटात गेले. त्यानंतर देखील त्यांचे वक्तव्य नेहमी चर्चेत राहिले आहेत. आता त्यानंतर त्यांचा हा पुणे दौरा चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT