अकोला: मुलीशी बोलला म्हणून अल्पवयीन मुलाला मारहाण, पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

मुंबई तक

04 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलल्यामुळे मारहाण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाने बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. अक्षय मुदगल असं या दुर्दैवी मुलाचं नाव असून तो दहावीत शिकत होता. अक्षय हा अकोला शहरातील राऊतवाडी भागात महाऋषीद्वार या बिल्डींगमध्ये रहायचा. 26 एप्रिलला अक्षयला काही जणांनी केवळ मुलीशी बोलतो म्हणून मारहाण केली […]

Mumbaitak
follow google news

अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलल्यामुळे मारहाण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाने बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. अक्षय मुदगल असं या दुर्दैवी मुलाचं नाव असून तो दहावीत शिकत होता.

हे वाचलं का?

अक्षय हा अकोला शहरातील राऊतवाडी भागात महाऋषीद्वार या बिल्डींगमध्ये रहायचा. 26 एप्रिलला अक्षयला काही जणांनी केवळ मुलीशी बोलतो म्हणून मारहाण केली होती. ही मारहाण होत असताना अक्षयच्या परिचीत अनेक व्यक्ती तिकडे उपस्थित होत्या. ज्यामुळे अक्षयला अपमान झाल्याची भावना मनात तयार झाली होती.

नागपूर : अनेकांना फसवणारी ‘लुटेरी दुल्हन’ अखेरीस अटकेत

या घटनेनंतर अक्षय घरी आला आणि त्याने रडत-रडत आपल्या मावसभावा फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. आत्महत्या करण्याआधी अक्षयने व्हिडीओ तयार करुन, मला मारहाण झाली तेव्हा तिकडे अनेक लोकं उपस्थित होती. माझा अपमान झाला, अता मला जगावसं वाटत नाही असं म्हणत अक्षयने पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली.

या घटनेमुळे मुदगल कुटुंबाला मोठा धक्का बसला असून अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. अक्षयच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी त्याच्या पालकांनी केली आहे.

    follow whatsapp