घराजवळ थुंकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा राग आल्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना दिव्यात उघडकीस आली आहे. रुपेश गोळे (१३ वर्ष) असे मयत मुलाचं नाव आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यातील नागवाडी परिसरात राहणाऱ्या आरोपी दशरथ काकडे रविवारी रुपेशच्या आईला खोटं सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या शौचालयच्या पहिल्या मजल्यावरील घेऊन गेला. तिकडे आरोपीने गळा दाबून रुपेशची हत्या केली. मयत मुलाचे वडील विजय यांनी बराच वेळ होऊनही मुलगा घरी न आल्यामुळे चौकशीला सुरुवात केली.
भयंकर.. अर्धनग्न अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न
मुलाच्या वडीलांशी दशरथकडे चौकशी केली असता, त्याने तो जत्रेत खेळत असल्याचं सांगितलं. परंतू रात्र झाल्यानंतरही रुपेश घरी न आल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली. यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत दशरथला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीदरम्यान दशरथ मयत रुपेशच्या ठावठिकाण्याबद्दल वारंवार वेगवेगळी उत्तर देत होता.
पुणे: चाकू थेट छातीत भोसकला, जावयाने ‘या’ कारणामुळे केली सासऱ्याची निर्घृण हत्या
यामुळे पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. अखेरीस पोलिसी खाक्यासमोर दशरथने आपला गुन्हा कबूल केला. सार्वजनिक शौचालयात कोणीही येत नाही याचा फायदा घेत दथरथने रुपेशची तिकडे गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी रुपेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीला अटक केली आहे.
अमरावतीत महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा कुटुंबीयांनी केला आरोप
ADVERTISEMENT