ऐकावं ते नवलच! बाबा रागावले म्हणून घर सोडून गेली अल्पवयीन मुलगी

मुंबई तक

• 07:16 AM • 15 Mar 2022

अभ्यास कर म्हणून बाबांनी रागवल्यामुळे अकोल्यातील एका १४ वर्षीय मुलीला राग आणि त्याच रागाच्या भरात तिने घर सोडायचा निर्णय घेतला. इतकच नव्हे तर आपली मैत्रीण घर सोडणार असं कळताच या मुलीच्या खास मैत्रिणीनेही घर सोडण्याचा निर्णय घेतला. अकोला शहरातील खदान परिसरातील कैलास टेकडी भागात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील […]

Mumbaitak
follow google news

अभ्यास कर म्हणून बाबांनी रागवल्यामुळे अकोल्यातील एका १४ वर्षीय मुलीला राग आणि त्याच रागाच्या भरात तिने घर सोडायचा निर्णय घेतला. इतकच नव्हे तर आपली मैत्रीण घर सोडणार असं कळताच या मुलीच्या खास मैत्रिणीनेही घर सोडण्याचा निर्णय घेतला. अकोला शहरातील खदान परिसरातील कैलास टेकडी भागात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील खदान भागात दोन अल्पवयीन मुली हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. या दोन्ही मुली नववीत शिक्षण घेत होत्या आणि ९ मार्चला घरात कोणालाही काहीही न सांगता त्या निघून गेल्या. अखेरीस पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे. या दोन्ही मुली परभणी रेल्वे स्थानकात पोलिसांना सापडल्या.

पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी या मुलींची चौकशी केली असता एका मुलीने बाबा रागावल्यामुळे घर सोडल्याचं सांगितलं. इतकच नव्हे तर आपली मैत्रीण घर सोडणार असं कळताच तिच्या जिवलग मैत्रिणीनेही तिला साथ दिली. या दोन्ही मुलींची पोलिसांनी समजूत काढून त्यांचं समुपदेशन केलं आहे.

Mumbai Tak Impact: पीएचडी विद्यार्थिनींचा मानसिक छळ, ‘त्या’ प्राध्यापकांची चौकशी होणार

९ मार्चला या दोन्ही मुली घर सोडून गेल्यानंतर बराच काळ परत न आल्यामुळे घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु करताच त्यांना या मुली अकोला-पूर्णा-परभणी असा प्रवास करत परभणी रेल्वे स्थानकात पोहचल्याचं कळलं. परभणी रेल्वे पोलिसांनी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. ज्यानंतर परभणी पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं.

    follow whatsapp