बेपत्ता बिंदास काव्या अखेर सापडली! कुठे होती काव्या यादव?

मुंबई तक

• 09:25 AM • 10 Sep 2022

युट्यूब, इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेली औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या अखेर सापडली आहे. रेल्वेने प्रवास करत असताना इटारसी येथे ती मिळून आली आहे.रेल्वे पोलिसांच्या ताब्यात ती सध्या असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितलं. शुक्रवारी दुपारी ती रागात घरातून बाहेर पडली होती. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना होता. तशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती. […]

Mumbaitak
follow google news

युट्यूब, इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेली औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या अखेर सापडली आहे. रेल्वेने प्रवास करत असताना इटारसी येथे ती मिळून आली आहे.रेल्वे पोलिसांच्या ताब्यात ती सध्या असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितलं. शुक्रवारी दुपारी ती रागात घरातून बाहेर पडली होती. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना होता. तशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती. अखेर ती इटारसी येथे मिळून आल्याने तिच्या कुटुंबीयाने आनंद व्यक्त केलाय.

हे वाचलं का?

नेमकं काय झालं होतं?

शुक्रवारी काव्याच्या वडिलांनी तिला अभ्यासावरून रागावले होते. त्यादरम्यान ती रागात घराबाहेर पडली होती. उशिरा रात्रीपर्यंत ती घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी पोलिसात धाव घेत कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. तसंच काव्या बेपत्ता असल्याचं सोशल मीडियावर तिच्या आईवडिलांनी सांगितलं. पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यांना काव्या रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रेल्वे पोलिसांची टीम लावली. पोलिसांना काव्या इटारसी येथे मिळून आली. आता ती नेमकी कोणत्या कारणामुळे घरातून बाहेर पडली होती, रेल्वेने ती कुठे जात होती, याबाबत तीच सांगू शकते.

बिंदास काव्याच्या आईवडिलांनी दिली होती बेपत्ता झाल्याची माहिती

बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यातून त्यांनी बिंदास काव्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर तिला घरी परत येण्यासाठी साद घातली होती. बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानं तिचे आईवडील चिंतेत होते, औरंगाबाद पोलिसांकडून बिंदास काव्याचा शोध घेतला जात होता. अखेर पोलिसांना यश आले आहे. बिंदास काव्याचे युट्यूब चॅनेल असून, त्याचे ४ मिलियनपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत.

बिंदास काव्याचं खरं नाव काय आहे?

प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्याचं वय १६ वर्ष असून, ती घरातून निघून गेली आहे. बिंदास काव्याचं खरं नाव काव्या यादव असं आहे. तिच्या सोशल हॅण्डल्सवरती बिंदास काव्या नाव आहे. त्यामुळे ती या नावानेच प्रसिद्ध आहे. बिंदास काव्या औरंगाबादमधील पडेगाव भागात राहते. राहत्या घरातूनच ती निघून गेली.

    follow whatsapp