संपत्तीत काही कोटींची घट तरीही प्रसाद लाड सर्व उमेदवारांना ‘भारी!’

मुंबई तक

• 04:51 PM • 13 Jun 2022

राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता २० जूनला विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड हे सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रसाद लाड यांनी १५२ कोटींची संपत्ती जाहीर केली. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांनी २१० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. प्रसाद लाड […]

Mumbaitak
follow google news

राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता २० जूनला विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड हे सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रसाद लाड यांनी १५२ कोटींची संपत्ती जाहीर केली. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांनी २१० कोटींची संपत्ती जाहीर केली होती.

हे वाचलं का?

प्रसाद लाड यांची जंगम मालमत्ता ३२ कोटी ५९ लाख तर पत्नीच्या नावे ५४ कोटी ६५ लाख तसंच हिंदू अविभक्त कुटुंबाची ७४ लाखांची संपत्ती आहे. त्यामध्ये दोन हजार २४ ग्रॅम सोने, हिरे, चांदी, १२ महागड्या घड्याळांचाही समावेश आहे. लाड कुटुंबाची स्थावर मालमत्ता ६४ कोटी ४६ लाखांची आहे. त्यामध्ये प्रसाद लाड यांच्या नावावरील मालमत्ता ३० कोटी ९१ लाखांची आहे.

प्रसाद लाड यांच्या पत्नीच्या नावे २९ कोटी १५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. घरं, व्यापारी गाळे आणि जमिनींचा त्यामध्ये समावेश आहे. लाड कुटुंबाची ७८ कोटी ३६ लाख रूपयांची देणी आहेत. लाड हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेसह क्रिस्टल कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी नीता या आठ कंपन्यांमध्ये संचालक आहेत.

विधान परिषद निवडणुकीला उभे असलेले इतर उमेदवार प्रसाद लाड यांच्या जवळपासही नाहीत.

शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा खुलासा

भाजपने प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा कापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली आहे. सदभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता, मात्र त्यांनी आज त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. विधान परिषदेच्या दहा जागा आहेत. येत्या २० जून रोजी हे मतदान होणार आहे.

रामराजे निंबाळकर तसंच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे याना उमेदवारी दिली आली आहे. तर शिवसेनेने सचिन आहिर आणि आमशा पाडवी या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. सदाभाऊ खोत हे देखील भाजपकडून उमेदवारी मिळालेले नेते होते मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी नाव मागे घेतलं आहे.

पंकजां मुंडेंना पुन्हा डच्चू! भाजपकडून दरेकर, लाड यांच्यासह पाच जणांना उमेदवारी

चंद्रकांत पाटील यांनी ये तो झंकी है 20 तारीख अभी बाकी है असं म्हणत दावा केला आहे की, विधानपरिषद निवडणुकीतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांनी म्हटलं की, राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल. मत दाखवून निवडणूक होती त्यात सुद्धा आम्ही विजयी झालो. विधान परिषदेला तर गुप्त मतदान असल्याने प्रतिसाद जास्त मिळेल हेदेखील त्यांनी म्हटलंय.

    follow whatsapp