मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार असून त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसांच्या दौर्यावर असणार आहे. त्या दरम्यान राज ठाकरे आजी माजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ADVERTISEMENT
बाबू वागसकर म्हणाले की, पुणे शहराच्या तीन दिवसाच्या दौर्यावर राज ठाकरे येत असून राज संवाद उपक्रमा अंतर्गत, सोमवारी 19 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 4 वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्या दिवशी मंगळवारी 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून 1 ते 4 दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे. दोन दिवसात शहरातील चार ही भागात बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्या दरम्यान प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार असल्याने, पुढील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे जात आहे. तर दौऱ्याच्या तिसर्या म्हणजेच बुधवारी कोरोना काळात ज्या संस्थांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याशी विशेष संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे असंच राजकीय जाणकारांचं या दौऱ्याबाबत मत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याआधी नाशिक दौऱ्यावरही होते. नाशिक दौऱ्याच्या दरम्यान त्यांची आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भेट झाली. त्यामुळे भाजप आणि मनसे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार का? याच्याही चर्चा रंगल्या. आता राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यात काहीही शंका नाही. मात्र राज ठाकरेंचा दौरा आहे त्यामुळे चर्चा तर होणारच!
ADVERTISEMENT