ADVERTISEMENT
राज ठाकरे यांचं मिसळ प्रेम सर्वश्रुतच आहे. यावेळी तर त्यांनी थेट मिसळ महोत्सवालाच भेट दिली. जिथे त्यांनी काही मिसळही चाखून पाहिल्या.
मनसेचे वांद्रे पूर्व विधानसभेतील शाखाध्यक्ष मनोज बापर्डेकर यांनी तीन दिवसीय ‘मिसळ महोत्सव’ आयोजित केला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी या महोत्सवाला भेट दिली.
यावेळी राज ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या मिसळ महोत्सवात सहभागी होऊन मनमुराद ‘मिसळ’आनंद लुटला.
राज ठाकरे हे पक्के खवय्ये आहेत. त्यातही मिसळ हा त्यांचा विक पॉईंट आहे.
राज ठाकरे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’ येथे अनेकदा जातात आणि तेथील मिसळीचा आनंद लुटतात.
आता उद्याच (12 एप्रिल) राज ठाकरेंची ठाण्यात सभा पार पडणार आहे. यावेळी देखील राज ठाकरे मामलेदार मिसळीवर ताव मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT