सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत केली आहे. आज झालेल्या भाषणात त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. गुढी पाडव्याच्या सभेत जे काही राज ठाकरे बोलले होते त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तरसभा घेण्यात आली. या सभेत राज ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले राज ठाकरे?
“शरद पवारच मोदींना भेटून रेड टाकायला सांगत असतील. मला सांगा अजित पवारांच्या घरी छापा पडतो. मात्र सुप्रिया सुळेंच्या नाही पडत. शरद पवारांना कधीही चिडलेलं पाहिलं नाही. अजित पवारांच्या घरी रेड पडली, नवाब मलिकांना अटक झाली तरीही शरद पवार आणि मोदींचे संबंध मधुर कसे? सुप्रिया सुळे यांनी काही बोलू नये सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे.”
राज ठाकरे बनले ‘हिंदुओका राजा’, उत्तरसभेआधी ‘या’ बॅनरची तुफान चर्चा
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
“राज ठाकरेंनी आमच्या सरकारवर टीका करणं साहजिक आहे. लाव रे तो व्हीडिओ म्हणणारे ईडीच्या एका नोटीसने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं.शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाईन होत नाही हे राज ठाकरेंना माहित आहे.”
आणखी काय म्हणाले राज ठाकरे?
मी परवा भाषण केल्यानंतर हे बोललं जातंय की ईडीची नोटीस आली आणि मी ट्रॅक बदलला. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी ट्रॅक नाही बदलला. मला त्याची गरजच नाही. IL and FS नावाची कंपनी होती त्याची चौकशी ईडीने केली. त्या कंपनीची नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त चाहूल लागली त्यानंतर केवढं नाटक झालं. या हातांनी काही पापच केलेलं नाही तर कोणत्याही नोटिशी असूदेत मी भीक घालत नाही. ज्यावेळी मी बोललो त्यावेळी मी उघडपणे बोललो. ज्या भूमिका नाही पटल्या त्या नाही पटल्या. पण ३७० कलम रद्द केलं तेव्हा अभिनंदन करणारा पहिला माणूस मी होतो. असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्यावर झालेल्या सगळ्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
‘ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि..’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांना टोला
आज दुपारी मी बसलो असताना मला एका पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की आपण किती वाजता निघणार आहात? मी विचारलं की का? तर त्यांनी मला सांगितलं काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी म्हटलं माझा? महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं पण शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहित असते. एखादा माणूस शिंकला तो कोरोनाचा शिंकला तेपण माहित असतं.
ADVERTISEMENT