मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन प्रमुख मागण्या, म्हणाले….

मुंबई तक

• 02:43 PM • 12 Apr 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्या दोन मागण्या आहेत त्या म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा ही एक मागणी. तर देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा या दोन प्रमुख मागण्या राज ठाकरे यांनी केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात आज उत्तर सभा घेतली या उत्तर सभेत […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्या दोन मागण्या आहेत त्या म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा ही एक मागणी. तर देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा या दोन प्रमुख मागण्या राज ठाकरे यांनी केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात आज उत्तर सभा घेतली या उत्तर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरे बनले ‘हिंदुओका राजा’, उत्तरसभेआधी ‘या’ बॅनरची तुफान चर्चा

तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींवर बोललो होतो. तेव्हा बोललो होतो, आता नाही बोललो. परत वेळ आली तर बोलेन. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजप शिवसेनेकडे पूर्ण सत्ता आली होती. पण तीन पक्षांचं सरकार आलं. त्याआधी एक पहाटेचं सरकार झालं होतं. या दोन्ही गोष्टी माझ्या भाषणात होत्या मग भाजपची स्क्रिप्ट कुठून आली?

आधी कुटुंबाला सांगा मुंबई महापालिकेत जाऊ नका; राज ठाकरे कडाडले! भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मी ट्रॅक बदलला असंही काहीजण बोलत आहेत. पण मला ट्रॅक नाही बदलावा लागत. IL and FS नावाची कंपनी होती त्याची चौकशी ईडीने केली. त्या कंपनीची नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त चाहूल लागली त्यानंतर केवढं नाटक झालं. या हातांनी काही पापच केलेलं नाही तर कोणत्याही नोटिशी असूदेत मी भीक घालत नाही. ज्यावेळी मी बोललो त्यावेळी मी उघडपणे बोललो. ज्या भूमिका नाही पटल्या त्या नाही पटल्या.

मात्र ३७० कलम रद्द केलं तेव्हा अभिनंदन करणारा पहिला माणूस मी होतो. राजीव गांधींच्या नंतर एक व्यक्तीच्या हातात सरकार आलं आहे. आजही माझी तीच मागणी आहे बाकीच्या गोष्टी सोडा, नरेंद्र मोदींना आज सांगणं आहे ते म्हणजे एक म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याचा कायदा आणा. आम्हाला काही आसूया नाही की आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच. पण या गोष्टी देशात होणं आवश्यक आहे. एखादे दिवशी हा देश फुटेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज दुपारी मी बसलो असताना मला एका पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की आपण किती वाजता निघणार आहात? मी विचारलं की का? तर त्यांनी मला सांगितलं काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी म्हटलं माझा? महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं पण शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहित असते. एखादा माणूस शिंकला तो कोरोनाचा शिंकला तेपण माहित असतं असाही टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

    follow whatsapp