नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 500 चौरस फूट घर असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा केली. या घोषणेवरून आता मनसेनं सवाल करत व्यंगचित्रातून शिवसेनेला टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT

मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीच ही घोषणा केली.
‘आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
या निर्णयाचा मुंबईतील 16 लाख कुटुंबांना लाभ मिळणार असून, 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आल्यामुळे महापालिकेचा दरवर्षी 340 कोटी रुपये कर बुडणार आहे. शिवसेनेनं निवडणूक वचननाम्यात मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं.
या निर्णयावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केलं आहे. ज्यात मराठी माणूस, कोस्टल रोड आणि मच्छिमार्केटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
CM Thackeray: ‘जे जमणार असेल तेच वचन द्यायचं, हीच शिवसेनेची परंपरा’, मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं?
हे व्यंगचित्र शेअर करताना ‘घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार?’, असा संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या व्यंगचित्रात कोळी बांधव आणि उद्धव ठाकरे असल्याचं दिसत आहे. ‘मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपार केलं. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का?’ असं या व्यंगचित्रात म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT