मंगळवारचा दिवस राज्यात गाजला तो शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातल्या वादामुळे. जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे आज त्यांच्याविरुद्ध नाशिक, पुणे, नागपूर अशा विविध शहरांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात आज प्रत्येक जिल्ह्यात शिवसैनिक राणेंविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
ADVERTISEMENT
या राड्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्विट करत दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे.
लॉकडाउनच्या काळात हालअपेष्टा भोगत असलेल्या सामान्य माणसाला या काळात चिखलफेक आणि दगडफेक पहावी लागत आहे असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.
यावेळी राजू पाटील यांनी राज्यातील अपुरं लसीकरण, बेरोजगारी, महागाई यासारख्या प्रकरणांवरुनही दोन्ही पक्षांना टोले लगावले.
मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून महाडमध्ये सोमवारी केलं. यानंतर आज दिवसभरात राज्यात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून प्रत्येक ठिकाणी राणेंविरुद्ध घोषणाबाजी सुरु आहे. जन आशिर्वाद यात्रेदरम्यान राणे संगमेश्वरमध्ये असताना रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT