राज ठाकरे यांचा गेल्या वर्षीचा अयोध्या दौरा चांगलाच गाजला होता. राज ठाकरे जाणार होते, मात्र तो दौरा झालाच नाही. राज ठाकरेंना भाजप खासदारानेच विरोध केला होता. आता भाजपच्या युपीतील खासदाराला महाराष्ट्र भाजपनंच बळ दिलं होतं, असा स्फोटक दावा मनसेच्याच नेत्यानं केलाय. दुसरीकडे हिंदुत्वावरून राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळेच भाजप विरुद्ध मनसे असं चित्र निर्माण झालंय.
ADVERTISEMENT
एकीकडे भाजप-मनसे एकत्र येण्याच्या होत असतानाच मनसेच्या नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केलाय. इतकंच नाही, तर राज ठाकरेंनीही पंतप्रधान मोदींसह भाजपला हिंदुत्वावरून खडे बोल सुनावलेत. एकापाठोपाठ एक आलेल्या विधानांमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. हा मुद्दा बराच गाजला होता. त्यानंतर राज ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलला गेला होता. आता याच मुद्द्यावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी गंभीर आरोप केलाय.
Rohit Pawar महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष; किरण सामंत उपाध्यक्षपदी
मनसेचे नेते प्रकाश महाजनाचा महाराष्ट्र भाजपवर गंभीर आरोप
“राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली, तेव्हा भाजपच्या एका टिनपाट गुंडानं अयोध्येत न येण्याची धमकी दिली होती. तेव्हा ही लोक गप्प होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापामध्ये महाराष्ट्र भाजप सामिल आहे”, असा दावा प्रकाश महाजनांनी केलाय.
प्रकाश महाजन असंही म्हणाले, “जर राज ठाकरे यांच्यावरील केसेस मागे घेतल्या नाहीत, तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ. नवीन राज्य आल्यानंतर लोक शिवतीर्थावर येतात, पण या सरकारला काही वाटत नाही की, राज ठाकरेंवरील खोट्या केस मागे घ्याव्यात, असंही प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
Video : संतोष बांगरांना मतदारसंघात रोखलं; संतापात गावकऱ्याला श्रीमुखात भडकावली!
हिंदुत्वावरून राज ठाकरेंनी केला तिखट सवाल
पुण्यात झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरेंची मुलाखत झाली. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी भाजपचा उल्लेख न करता सवाल केला. “पाकिस्तानी कलाकारांना ज्यावेळी हाकलून दिलं. सो कॉल्ड हिंदुत्ववादी म्हणवतात, ते कुठे होते?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.
मोदींकडून गुजरातला प्राधान्य दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी तिखट भाष्य केलं. “आपण गुजराती आहोत म्हणून गुजरातकडे लक्ष देणं एका पंतप्रधानाला शोधत नाही. मोदींनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक राज्य समान मुलासारखं असलं पाहिजे,” अशा शब्दात ठाकरेंनी थेट मोदींना सुनावलं.
ADVERTISEMENT