Raj Thackeray: “नव्या दमाने, नव्या…”; मनसेचा ‘पिक्चर’ आधी ट्रेलर आला

मुंबई तक

• 09:47 PM • 07 Mar 2023

Raj Thackeray : राज्यातील राजकीय घडामोडींवर आता ट्रेलर नाही, तर पिक्चर दाखवणार, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले आणि ठाकरे नेमका कोणता पिक्चर दाखवणार याची चर्चा सुरू झाली. 9 मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन (mns foundation day) आहे. यंदा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठाण्यात (Thane) होणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) काय […]

Mumbaitak
follow google news

Raj Thackeray : राज्यातील राजकीय घडामोडींवर आता ट्रेलर नाही, तर पिक्चर दाखवणार, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले आणि ठाकरे नेमका कोणता पिक्चर दाखवणार याची चर्चा सुरू झाली. 9 मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन (mns foundation day) आहे. यंदा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठाण्यात (Thane) होणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार? याची उत्सुकता असतानाच मनसेकडून (MNS) एक ट्रेलर (Trailer) रिलीज करण्यात आला आहे. (MNS Released Trailer before Raj Thackeray Thane Rally)

हे वाचलं का?

सध्या राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच कुरघोड्या होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय धुळवड जोरात सुरू असून, राज्यातील राजकीय स्थितीवर राज ठाकरेंनी अधिकच बोलणं टाळत वर्धापन दिनी पिक्चर दाखवणार (म्हणजे सविस्तर बोलणार) म्हणत उत्सुकता निर्माण केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन : ठाण्यात ठाकरेंची सभा

9 मार्चला मनसे वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची सभा होत असल्यानं त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

MNS: ‘आमदार राजू पाटलांनी मनसेवर दावा केला तर?’, राज ठाकरे म्हणाले..

नवनिर्माणास सज्ज! राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेकडून ट्रेलर रिलीज

वर्धापन दिनी होत असलेल्या सभेपूर्वी मनसेकडून एक ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करण्यात आला असून, नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर मनसेचा झेंडा फडफडतो. त्यानंतर मनसे काढलेल्या मोर्चाची दृश्ये आणि राज ठाकरे यांच्या मागील सभेचे दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर “नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज”, असा संदेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राज ठाकरे काय बोलणार?

राज्यात सध्या अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका, अर्थसंकल्पीय अधिवेशन, राजकीय नेत्यांच्या विधानावरून सुरू असलेलं वादंग, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कांद्याचे भाव या विषयांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडत आहे. या मुद्द्यांवर राज ठाकरे बोलू शकतात.

Raj Thackeray: राज ठाकरे प्रचंड संतापले, मनसे नेत्यांना दमच भरला; म्हणाले…

त्याचबरोबर चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला होता. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्रही लिहिलं होतं. मात्र, महाविकास आघाडीची भूमिका कायम राहिली. यावरूनही राज ठाकरे महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करू शकतात.

    follow whatsapp