मोदी सरकारने वाढलेल्या महागाईत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत साखरेवर निर्यात बंदी (Sugar Export) घालण्याचा हा निर्णय आहे. त्यामुळे आता खाद्यतेलाच्या पाठोपाठ साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे देशातंर्गत साखरेचे दर वाढत होते. या दरांवर नियंत्रण ठेवलं जावं म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
ADVERTISEMENT
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांचं अर्थकारण मात्र बिघडण्याची चिन्हं आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये सरकार मोठे निर्णय घेतं आहे. सुरूवातीला गव्हाची निर्यात बंद करण्यात आली. त्यानंतर इंधनाचे दर म्हणजेच पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्यात आला त्यामुळे १२० रूपये प्रति लिटरपर्यंत गेलेलं पेट्रोल हे १११ रूपये प्रति लिटरवर आलं. आता १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही निर्यात बंदी ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं, तुमच्या शहरातील नेमके दर काय?
मोदी सरकारने यंदा साखरेच्या निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता २०२१-२२ च्या साखर हंगामात निर्यातदार १०० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात साखरेच्या साठ्याबाबत कोणतीही चिंता नसून, गेल्या सहा वर्षांतील साखरेची निर्यात यंदा सर्वाधिक असल्यानं खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पर्यायी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर शाहांसोबत काय झाली चर्चा?; फडणवीसांनी दिलं उत्तर
असं सगळं असलं तरीही महाराष्ट्रातील साखर कारखानदारांसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे साखर मात्र स्वस्त होणार आहे. २३ मे रोजी देशात साखरेची सरासरी किंमत ४२ रूपये प्रति किलो इतकी होती. आता तर जास्तीत जास्त किंम ५३ रूपये प्रति किलो पर्यंत गेली होती. आता या किंमती आणखी कमी होणार आहेत. महागाईच्या झळा सोसणाऱ्या ग्राहकांना थोडासा गोड दिलासा या बातमीने दिला आहे.
ADVERTISEMENT