महाराष्ट्राला Remdesivir विकाल तर कारवाई करू, मोदी सरकारची कंपन्यांना धमकी- नवाब मलिक

सौरभ वक्तानिया

• 09:22 AM • 17 Apr 2021

राज्यासह देशभरात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर घोंगावतं आहे. कोरोनासाठी लसींचा तुटवडा महाराष्ट्रात भासतोच आहे त्यापाठोपाठ रेमडेसिवीर या इंजेक्शनचाही तुटवडा भासू लागला आहे. याच रेमडेसिवीर संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकाल तर तुमचा परवाना रद्द करू अशी धमकी या कंपन्यांना मोदी सराकारने दिली आहे असा आरोप […]

Mumbaitak
follow google news

राज्यासह देशभरात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर घोंगावतं आहे. कोरोनासाठी लसींचा तुटवडा महाराष्ट्रात भासतोच आहे त्यापाठोपाठ रेमडेसिवीर या इंजेक्शनचाही तुटवडा भासू लागला आहे. याच रेमडेसिवीर संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकाल तर तुमचा परवाना रद्द करू अशी धमकी या कंपन्यांना मोदी सराकारने दिली आहे असा आरोप मलिक यांनी केला आहे.

हे वाचलं का?

27 हजार रेमडेसिवीर येतात, मग जातात कुठे? गुजरात सरकारला हायकोर्टाने झापलं

काय म्हणाले नवाब मलिक?

दररोज देशात कोरोनाचे 2 लाखांच्या जवळपास रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. महाराष्ट्रात रूग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण 60 हजारांच्या घरात पोहचलं आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. तसंच रेमडेसिवीर या औषधाचाही तुटवडा भासतो आहे. आम्ही यासंदर्भातली मागणी केंद्राकडे केल्यानंतर केंद्र सरकारने या औषधावर निर्यातबंदी लावली. ज्या 16 कंपन्या विदेशात हे औषध पाठवू शकत होत्या ते आता पाठवू शकत नाहीत. त्यांनी सरकारकडे संमती मागितली की आम्हाला हे औषध देशात विकण्याची संमती द्या.

महाराष्ट्र सरकारला जेव्हा ही बाब समजली तेव्हा महाराष्ट्र सरकारने थेट या कंपन्यांकडे आम्ही तुमच्याकडून रेमडेसिवीर घेऊ शकतो अशी तयारी दर्शवली. तेव्हा कंपन्यांनी ही बाब केंद्राला सांगितली. त्यानंतर केंद्र सरकारने या कंपन्यांना असं सांगितलं की महाराष्ट्र सरकारला जर रेमडेसिवीर विकाल तर तुमचे परवाने रद्द केले जातील, तुमच्यावर कारवाई होईल केंद्र सरकारचं हे धोरण अत्यंत घातक आहे. 20 लाख इंजेक्शन्स निर्यात झालेली नाही. महाराष्ट्र सरकार ही इंजेक्शन्स खरेदी करू इच्छिते मात्र केंद्राने त्यांना कारवाईचा इशाला दिला आहे नेमकं केंद्राचं कोणतं धोरण आहे? केंद्राने असं धोरण अवलंबलं तर राज्यांनाही योग्य ती पावलं उचलावीच लागतील असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

Oxygen तुटवड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन, मोदी प्रचारात असल्याने होऊ शकलं नाही बोलणं

महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठाही कमी पडतो आहे. यासाठी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. मात्र पंतप्रधान पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त असल्याने या दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबतही उद्धव ठाकरे हे मोदींना सांगणार होते. मात्र पंतप्रधान तुम्हाला नंतर फोन करतील असं उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. अशात नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्राला ते औषध विकाल तर कारवाई करू असं म्हटलं आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. केंद्र सरकारचं हे धोरण आहे तरी काय? महाराष्ट्राच्या बाबतीत हा दुजाभाव का होतो आहे असाही प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे.

    follow whatsapp