Monsoon in Mumbai : रविवार-सोमवार शहरात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज

मुंबई तक

• 02:10 AM • 12 Jun 2021

९ जूनला मुंबईत दाखल होताच मान्सूनने मुंबईची दाणादाण उडवली. गेल्या ४ दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यातच रविवार आणि सोमवारचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत धोक्याचा असून या दिवशी IMD ने मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून समुद्रकिनाऱ्यालगत […]

Mumbaitak
follow google news

९ जूनला मुंबईत दाखल होताच मान्सूनने मुंबईची दाणादाण उडवली. गेल्या ४ दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यातच रविवार आणि सोमवारचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत धोक्याचा असून या दिवशी IMD ने मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यापासून सर्व आपात्कालीन सोयी-सुवीधा BMC ने सज्ज ठेवल्या आहेत. जाणून घेऊयात दोन दिवसांसाठी मुंबई महापालिकेने शहरात कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी काय तयारी केली आहे.

१. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला असून सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहे.

२. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज आहेत.

३. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व विविध ठिकाणी बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्थादेखील स्थानिक उदंचन संच चालकांद्वारे करण्यात आली आहे.

४. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत.

५. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे.

६. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत.

७. बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे आले असून त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.

८. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतत्पर आहे.

९. आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.

१०. मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आली असून त्वरीत मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.

११. शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता सुसज्ज आहेत.

    follow whatsapp