Mood of the Nation Survey Bharat Jodo Yatra and Rahul Gandhi: मुंबई: देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचा (BJP) बोलबाला असताना दुसरीकडे त्यांच्या या वर्चस्वाला आणि देशातील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी (Rahul Modi) हे पुन्हा एकदा सज्ज झाले. ‘भारत जोडो यात्रेच्या’ निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुकंलं आहे. आता याच भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार याबाबत India Today-C Voter ने एक सर्व्हे केला असून यात जनतेचा नेमका कौल काय आहे हे सविस्तर जाणून घ्या. (mood of the nation india today c voter will bharat jodo yatra undermine bjps power)
ADVERTISEMENT
आताच्या सर्व्हेनुसार, भारत जोडो यात्रेला सहा महिने होऊन सुद्धा काँग्रेसच्या मतांमध्ये फारसा फरक झालेला दिसत नाही. काँग्रेसने फारशी उडी मारलेली दिसत नाही. आपण असं मानूयात की, निवडणुकीसाठी राहुल गांधींनी ही यात्रा केलेली नव्हती. पण तरीही त्याचा एक इम्पॅक्ट दिसायला हवा होता. विशेषत: उत्तर भारतात. तो झालेला दिसत नाही.
याबाबत C-Voter चे संस्थापक यशवंत देशमुख यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.
यशवंत देमशमुख म्हणाले की, ‘याचं प्रमुख कारण म्हणजे राहुल गांधींनी केरळमध्ये जेवढे दिवस या यात्रेसाठी दिले तेवढे दिवस उत्तर भारतात अजिबात दिले नाहीत. असं आहे की, लोकांना भारत जोडो यात्रेबाबत म्हटलं की, छान यात्र आहे, चांगला प्रयत्न आहे. काहीही नसण्यापेक्षा काही तरी होतंय हे महत्त्वाचं. प्रत्येक राज्यातून यात्रा गेली त्यानंतर राहुल गांधींच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे.’
‘लोकांना असंही वाटतं की, आता राहुल गांधींनी जे केलं ते छान केलं. पण नंतर त्याचा फॉलोअप काय? त्याबाबतीत पुढे काही होणार की, हा फक्त एक इव्हेंट असणार. याबाबत लोकांना जोवर स्पष्टता येणार नाही तोवर रेटिंग फार वाढणार नाही.’
‘पण जेव्हा आम्ही लोकांना विचारतो की, कोणता विरोधी पक्ष नेता प्रभावी आहे. तर त्या प्रश्नावर लोकं अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जीचं नाव घेतात. राहुल गांधींचं नाव घेत नाही. तर अडचण ही आहे की, मोदींचं रेटिंग हे भाजपपेक्षा जास्त आहे. तर राहुल गांधींचं वैयक्तिक रेटिंग हे काँग्रेसपेक्षा कमी आहे.’
Mood Of The Nation : भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे
‘राहुल गांधींकडे अद्यापही लोक नेते म्हणून पाहत आहेत. तसंच इतिहास देखील हे सांगतो की, एकही यात्रा ही निष्फळ झालेली नाही. जेव्हा-जेव्हा कोणी यात्रा काढली त्याचा त्या व्यक्तीला फायदा झालाच आहे. तर राहुल गांधींनी एवढी मोठी यात्रा काढली त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार. सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना फक्त 9 टक्के पसंती मिळाली होती. पण आता या यात्रेनंतर 14 टक्के पसंती त्यांना मिळाली आहे.’
‘सहा महिन्यांआधी राहुल गांधींना 9 टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना 7 टक्के पसंती होती. जी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा होती.’ असं मत यशवंत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
Mood Of The Nation : आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात भाजपसाठी धक्कादायक चित्र
कोणत्या राज्यांमध्ये NDA च्या जागांची काय असेल स्थिती?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांमध्ये त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे आसाम, तेलंगणा, प. बंगाल आणि उ. प्रदेशमध्ये मात्र NDA च्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सर्व्हेनुसार कर्नाटक आणि महाराष्ट्रात UPA ची कामगिरी सुधारलेली दिसते आहे. जिथे बराच काळ भारत जोडो यात्रा होती. महाराष्ट्रात सर्वात जास्त फटका हा NDA ला बसू शकतो. तर बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्याने तिथेही त्यांना बराच फटका बसू शकतो.
या सर्व्हेनुसार, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा अगदी प्रचंड प्रमाणात काँग्रेसला फायदा होणार नसला तरी काही प्रमाणात ते भाजपला नुकसान पोहचवू शकतात.
ADVERTISEMENT