महाराष्ट्रात 48 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

मुंबई तक

• 03:55 PM • 17 May 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 48 हजार 211 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 48 लाख 74 हजार 582 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 90.19 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज दिवसभरात 26 हजार 616 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 516 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 48 हजार 211 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 48 लाख 74 हजार 582 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 90.19 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज दिवसभरात 26 हजार 616 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 516 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या 1.53 टक्के इतका आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 13 लाख 38 हजार 407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 5 हजार 68 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 33 लाख 74 हजार 258 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 4 लाख 45 हजार 495 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात 26 हजार 616 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 54 लाख 5 हजार 68 इतकी झाली आहे.

कौतुकास्पद! Tauktae Cyclone असूनही डॉक्टर, नर्सेस, कोरोना रूग्णांसाठी डबेवाल्यांची सेवा

आज नोंद झालेल्या 516 मृत्यूंपैकी 289 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 227 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू हे कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाले आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

‘दुसरा भी हो गया’ म्हणत अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई – 32 हजार 761

ठाणे- 28 हजार 996

पालघर- 10 हजार 484

रत्नागिरी- 11 हजार 612

पुणे – 76 हजार 160

सातारा- 21 हजार 177

सांगली- 19 हजार 547

कोल्हापूर- 17 हजार 37

नाशिक- 23 हजार 401

अहमदनगर- 17 हजार 885

जळगाव 10 हजार 780

बीड- 10 हजार 699

अमरावती- 10 हजार 205

नागपूर – 29 हजार 428

चंद्रपूर- 11 हजार 205

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही भयंकर ठरली. या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तसंच कोरोनाही झपाट्याने पसरत होता हे राज्याने पाहिलं. आता हळू हळू रूग्णसंख्या कमी होते आहे. हे गेले काही दिवस समोर येणारे बाधित रूग्णांचे आकडे सांगत आहेत. अशात चिंतेची बाब आहे ती मृत्यूंची. महाराष्ट्रात मृत्यूंचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये हे मात्र नक्की.

    follow whatsapp