महाराष्ट्रात 5 हजार 31 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 380 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 216 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. मागील काही दिवसांमध्ये रोज आढळणारे कोरोना रूग्णसंख्येत सातत्य दिसून येतं आहे. आज दिवसभरात राज्यात 5 हजार 31 नवे रूग्ण आढळले आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात आजवर 62 लाख 47 हजार 414 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.04 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात राज्यात 5 हजार 31 रूग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 36 हजार 680 इतकी झाली आहे. तर राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 28 लाख 40 हजार 805 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 37 हजार 680 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला 50 हजार 183 सक्रिय रूग्ण आहेत. तर 2 लाख 98 हजार 264 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर 2369 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
महाराष्ट्रातली प्रमुख शहरं आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई- 3112
ठाणे- 7041
पुणे – 12673
सातारा- 5400
सांगली-4668
सोलापूर- 3979
अहमदनगर- 4716
मुंबईत 343 नवे रूग्ण
मुंबईत दिवसभरात 343 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 272 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 20 हजार 750 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 2855 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1884 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात 399 नवे रूग्ण
पुण्यात 399 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 206 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला पुण्यात 2066 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात आत्तापर्यंत 4 लाख 83 हजार 221 रूग्णांनी कोरोनावर मात दिली आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही प्रमाणात निर्बंध आहेत. काही दिवसांपूर्वीच तिसरी लाट येऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून पूर्णतः काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
ADVERTISEMENT