महाराष्ट्रात 58 हजार 952 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात 278 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.64 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 39 हजार 624 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 29 लाख 5 हजार 721 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 81.21 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
यवतमाळ-भंडाऱ्यात Corona चा कहर, दोन्ही जिल्ह्यात दिवसभरात 2238 जण पॉझिटिव्ह
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 28 लाख 2 हजार 200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35 लाख 78 हजार 160 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 55 हजार 206 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 12 हजार 70 रूग्ण सक्रिय आहेत.
15 दिवसांचा Lockdown नाही, महाराष्ट्राला 200 दिवसांच्या लसीकरणाची गरज
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि त्यातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई – 86 हजार 635
ठाणे- 84 हजार 98
पुणे – 1 लाख 12 हजार 213
सोलापूर-10 हजार 231
नाशिक- 44 हजार 880
अहमदनगर- 17 हजार 937
जळगाव- 12 हजार 126
औरंगाबाद-14 हजार 680
लातूर-13 हजार 622
नांदेड- 13 हजार 917
नागपूर- 65 हजार 368
प्रमुख जिल्ह्यांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपुरात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. नागपुरात 65 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यात 1 लाख 12 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. ठाण्यात 84 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर मुंबईत 86 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या 278 मृत्यूंपैकी 170 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत तर 73 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 35 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे 35 मृत्यू नागपूर 15,ठाणे 7, नांदेड 4, जळगाव 3, नाशिक 2, अहमदनगर 1 , उस्मानाबाद 1 सोलापूर 1 आणि यवतमाळ 1 असे आहेत.
ADVERTISEMENT