महाराष्ट्रात Corona चा कहर, दिवसभरात 63 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबई तक

• 03:54 PM • 11 Apr 2021

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसभरात महाराष्ट्रात 63 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात दिवसभरात 34 हजार 8 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.65 टक्के इतके झाले आहे. राज्यात 349 […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसभरात महाराष्ट्रात 63 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात दिवसभरात 34 हजार 8 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रूग्ण बरे झाले आहेत.

हे वाचलं का?

राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.65 टक्के इतके झाले आहे. राज्यात 349 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.7 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 21 लाख 14 हजार 372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34 लाख 7 हजार 245 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

नागपुरात कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलला आग, चार जणांचा मृत्यू

सध्या राज्यात 31 लाख 75 हजार 585 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 25 हजार 694 व्यक्ती संस्थात्मक व्यक्ती क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 5 लाख 65 हजार 587 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 63 हजार 294 नव्या रूग्णांची नोंद झाली.

आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 34 लाख 7 हजार 245 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 349 मृत्यूंपैकी 210 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 78 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 61 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 61 मृत्यू नागपूर-15, सांगली-15, औरंगाबाद-8, अहमदनगर-4, हिंगोली-3, जळगाव-3, परभणी-3, बुलढाणा-2, नाशिक-2, जालना-1, उस्मानाबद 1, रायगड-1, ठाणे-1 आणि वाशिम-1 असे आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या तीन आठवड्यांत आटोक्यात येईल? प्रदीप आवटेंनी दिलं उत्तर

महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई – 91 हजार 100

ठाणे-74 हजार 335

पुणे- 1 लाख 9 हजार 590

अहमदनगर – 19 हजार 937

नाशिक- 35 हजार 147

औरंगाबाद- 17 हजार 69

नागपूर-58 हजार 507

कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेसचा विचार केला तर सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण 1 लाखांपेक्षा जास्त रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत 91 हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर ठाण्यात 74 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आहेत. ही जिल्हानिहाय संख्या आहे.

    follow whatsapp