महाराष्ट्रात दिवसभरात 66 हजार 159 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात 771 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.5 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 68 हजार 537 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 37 लाख 99 हजार 266 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 83.69 टक्के एवढा झाला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 15 मे पर्यंत वाढला Lockdown, ठाकरे सरकारचे आदेश
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 68 लाख 16 हजार 75 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 45 लाख 39 हजार 553 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 70 हजार 301 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत असंही महाऱाष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. आज दिवसभरात राज्यात 66 हजार 159 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 45 लाख 39 हजार 553 इतकी झाली आहे.
‘दिल्ली- महाराष्ट्रात Lockdown चा चांगला परिणाम, पण टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट अजूनही जास्त’
दिवसभरात नोंद झालेल्या 771 मृत्यूंपैकी 383 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत तर 165 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 223 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू पुणे 105, नागपूर 29, औरंगाबाद 23, नंदुरबार 23, ठाणे 17 ,भंडारा 6, कोल्हापूर 4, जळगाव 3, सोलापूर 3, हिंगोली 2, नांदेड 2, रायगड 2, जालना 1, नाशिक 1, पालघर 1 आणि सांगली 1 असे आहेत.
ADVERTISEMENT