महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 96 टक्के

मुंबई तक

• 03:06 PM • 02 Jul 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 385 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 58 लाख 36 हजार 920 कोरोना रूग्ण राज्यात बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.1 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज 156 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के एवढा […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 385 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 58 लाख 36 हजार 920 कोरोना रूग्ण राज्यात बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.1 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज 156 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के एवढा आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 20 लाख 96 हजार 506 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 79 हजार 352 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 24 हजार 745 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 16 हजार 867 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 8 हजार 753 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 लाख 79 हजार 352 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 156 मृत्यूंपैकी 129 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 27 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई – 12 हजार 905

ठाणे – 16 हजार 339

पुणे- 17 हजार 13

सांगली- 10 हजार 999

कोल्हापूर- 12 हजार 767

महाराष्ट्रातले पाच जिल्हे असे आहेत जिथे दहा हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आज घडीला आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे आहेत. सध्या राज्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण जरी वाढलं असलं तरीही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका जाणवतो आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

    follow whatsapp