आईने पबजी (PUBG Game) खेळण्यापासून थांबवल्याने एका १६ वर्षांच्या मुलाने आईवर गोळी झाडून तिला ठार केलं. या अल्पवयीन मुलाला पबजी (PUBG Game) खेळण्याची सवय लागली होती. आईने त्याला PUBG खेळ खेळण्यापासून रोखत असे. मात्र आता ही घटना समोर आली आहे. या घटनेत या मुलाने त्याच्या आईच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर अंडा करी मागवत मित्रांसोबत पार्टीही केली.
ADVERTISEMENT
दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या राग, बेडरुममध्ये घुसून
प्रेयसीची हत्या; प्रियकराने स्वत:लाही संपवलं!
उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश मधल्या लखनऊ शहरातल्या पीआयजी भागात हा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा राहतो. त्याने आई पबजी (PUBG Game) खेळण्यापासून रोखते म्हणून तिला गोळी घालून ठार केलं. त्यानंतर मित्रांना बोलावलं ऑनलाईन अंडा करी मागवली आणि पार्टीही केली. मित्रांनी जेव्हा त्याला विचारलं की आई कुठे आहे? तर त्याने सांगितलं की ती काका-काकूंच्या घरी गेली आहे.
लखनऊतल्या यमुनापुरम कॉलनीत एका अल्पवयीन मुलाला गेम खेळण्याची सवय लागली होती. याच सवयीतून या मुलाने त्याच्या आईचा जीव घेतला. हा मुलगा अल्पवयीन आहे. त्याने पोलिसांसमोर हे मान्य केलं आहे की त्याची आई त्याला गेम खेळण्यापासून रोखायची. त्यामुळेच नाराज होऊन रविवारी रात्री उशिरा त्याने वडिलांच्या लायसन्स पिस्तुलातून आईच्या डोक्यात गोळी झाडली आणि तिची हत्या केली.
एवढंच नाही तर या घटनेनंतर या मुलाने त्याच्या लहान बहिणीला दरडावून खोलीत कोंडून ठेवलं. ही मुलगी दुसऱ्या दिवसापर्यंत आईच्या मृतदेहासह याच खोलीत बंद होती. मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर या मुलाने रूम फ्रेशनरही मारला. तरीही शेजाऱ्यांना वास येऊ लागला त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांनी या मुलाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने या हत्येची कबुली दिली.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलाचे वडील लष्करात आहेत आणि ते सध्या बंगालमध्ये तैनात आहेत. त्यांचं रिव्हॉल्वर घरातच होतं. एका गेमच्या नादात या मुलाने एक कुटुंब उद्धवस्त करून टाकलं.
ADVERTISEMENT