– इसरार चिश्ती, औरंगाबाद प्रतिनिधी
ADVERTISEMENT
कोणत्याही मुलाचं आणि आपल्या आईचं एक खास नातं असतं असं म्हणतात. आईही आपल्या मुलांसाठी कठीण प्रसंगात जिवाची बाजी लावताना आपण अनेकदा पाहिलं आहे. परंतू आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात घडली आहे. मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याची हत्या केली आहे.
सार्थक बागुल (वय ९) असं या मुलाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणात सार्थकची आई संगीता बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव पवारला अटक केली आहे. आपली बदनामी होईल या भितीने संगीता आणि साहेबराव यांनी सार्थकची हत्या केल्याचं समोर आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता आणि साहेबराव यांचे गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक संबंध सुरु होते. साहेबराव पवार याचं संगीताच्या घरी येणं-जाणं होतं. एक दिवस सार्थकने आपली आई संगीताला साहेबराव सोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. परंतू ही बाब लक्षात आल्यानंतर संगीता आणि साहेबराव यांच्या मनात बदनामीच्या भूताने जागा घेतली. यातूनच त्यांनी सार्थकची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
व्हिडीओ कॉल करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर गळफास घेऊन मुलाने संपवलं आयुष्य
११ फेब्रुवारीला दोघांनीही सार्थकला विश्वासात घेऊन मोटारसायकलवर बसवत एका निर्जन स्थळी नेलं. तिकडे दोघांनीही गळा आवळत सार्थकची हत्या केली. संगीताने हत्येच्या आधीच आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर पोलिसांना तळवाडा परिसरातील निर्जन भागात एका मुलाचा मृतदेह सापडल्याचं समजलं. परंतू मृतदेहाची अवस्था खराब झाल्यामुळे ओळख पटवणं पोलिसांसाठी कठीण जात होतं.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लहान मुलाचा मृतदेह सडत चालल्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतू पोलिसांनी मृतदेहाचा फोटो घेत What’s App च्या माध्यमातून व्हायरल करत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर संगीताने दाखल केलेल्या तक्रारीशी मृतदेहाचा फोटो मिळता जुळता होता. अधिक चौकशी केली असता तो मृतदेह सार्थकचाच असल्याचं पोलिसांना लक्षात आलं.
महाराष्ट्र हादरला ! ५५ वर्षीय नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार
यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असता आई संगीताला ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीदरम्यान संगीताने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ज्यानंतर पोलिसांनी संगीताचा प्रियकर साहेबरावलाही अटक केली आहे.
लिव्ह इन रिलेशनशीपचा हव्यास… मुलीने जन्मदात्या आईचा गळाच चिरला!
ADVERTISEMENT