– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
नागपूर शहरात घरगुती वादातून आईने दारुच्या आहारी गेलेल्या आपल्याच मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. शुभम उर्फ भुऱ्या नानवटे असं या मयत तरुणाचं नाव असून या गुन्ह्यात आईला तिच्या दुसऱ्या मुलानेही सहकार्य केल्याचं समोर आलंय.
जाणून घ्या काय आहे पार्श्वभूमी?
आरोपी रंजना अशोक नानवटे या नागपूर शहरातील नंदनवन भागात आपल्या दोन मुलांसह राहतात. रंजना यांचा मोठा मुलगा विक्की उर्फ नरेंद्र हा नागपूरमधील एका नामांकित शिक्षणसंस्थेत कामाला आहे. रंजना यांचा दुसरा मुलगा शुभम उर्फ भुऱ्या हा कोणताही कामधंदा करत नव्हता. शुभमला दारुचा नाद लागल्यामुळे प्रत्येक दिवशी त्याचे घरात वाद व्हायचे.
काही दिवसांपूर्वीच शुभमने एका मुलीशी लग्न केलं होतं, ज्यानंतर त्याने घरात दारु पिऊन वाद घातला.
Pune Crime : दहावीतील विद्यार्थिनीवर माथेफिरु तरुणाचे चाकूने वार, आरोपी फरार
पत्नीच्या सोनोग्राफीसाठी मागितले पाच हजार रुपये आणि वादाला सुरुवात –
शुभमने आपल्या पत्नीच्या सोनोग्राफीसाठी आई रंजना यांच्याकडे पाच हजार रुपये मागितले. परंतू आईने हे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे शुभम संतापला होता. यानंतर त्याने पुन्हा वाद घालायला सुरुवात केल्यानंतर रंजना यांनी आपला मोठा मुलगा विक्कीला बोलावून घेतलं. विक्की घरी आल्यानंतर दोन्ही भावांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. ज्यानंतर शुभम उर्फ भुऱ्याने स्वतःच्यात डोक्यात वीट मारुन घेतली.
यानंतर विक्कीने शुभमला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आलं.
नागपूर: प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या; सावनेर भागातली घटना, परिसरात खळबळ
रात्री शुभमला औषध देऊन झोपण्यात आल्यानंतर त्याचा सकाळी मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. आई रंजना आणि मोठा भाऊ विक्की यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला असता शुभमची पत्नी निकीताने नंदनवन पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन शुभमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. ज्यात त्याचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं समोर आलं. ज्यावेळी भुऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा आई आणि मोठा भाऊ घरात असल्यामुळे पोलिसांचा पहिला संशय थेट त्यांच्यावरच गेला. यानंतर चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
पीएचडीच्या विद्यार्थिनींचा मानसिक छळ; अपमानास्पद वागणूक, पैशांची मागणी केल्याचा आरोप
ADVERTISEMENT