जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे एका विवाहितीने आपल्या चार मुलांसह विहीरीत उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत आई गंगासारग अडाणी यांच्यासह त्यांची मुलं भक्ती (वय १३), ईश्वरी (वय ११), अक्षरा (वय ९) आणि मुलगा युवराज (वय ७) यांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात. ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजल्याच्या दरम्यान गंगासागर ह्या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचं गावकऱ्यांनी पाहिलं होतं. गंगासागर यांनी मुला-मुलींसह सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंत ही पत्नी मुलांसह परत आली नाही म्हणून ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाही.
यानंतर घरच्यांनी व गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरूच केला. आजूबाजूच्या शेतात व विहिरींमध्ये ही शोधमोहीम सुरु होती. त्यानंतर रात्रभर शोध घेऊनही गंगासागर व मुलांचा पत्ता लागला नाही. यानंतर सकाळी काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताच्या शेजारील गणेश फिसके यांच्या गट क्रमांक ९३ मधील विहिरीत पाचही जणांचे मूतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडया मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले.
प्रेयसीच्या विरहात प्रियकराची आत्महत्या, मुलीच्या वडिलांनी तरुणाला पाठवलेलं तुरुंगात
दरम्यान या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ सह कर्मचारी हजर होऊन या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गोदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कल्याण: तरुणीसोबत शारीरिक संबंध, गर्भपात.. बोहल्यावर चढण्याअगोदर पोलिसांनी आवळल्या नवरदेवाच्या मुसक्या
ADVERTISEMENT