नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून Mukar Mycosis अर्थात काळी बुरशी होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे. हा आजार झालेल्या 15 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो आहे. याची कारणं वेगवेगळी आहेत जसे की आजार योग्यवेळी लक्षात न येणं, योग्य वेळी उपचार आणि औषधं न मिळणं. काळ्या बुरशीचा संसर्ग डोळे आणि मेंदू यांच्या संसर्ग डोळे आणि मेंदूपर्यंत जाणे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्युकरमायकोसिसच्या रूग्णांचे म्हणजेच काळ्या बुरशीच्या रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. मागील सात दिवसात हे रूग्ण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
ADVERTISEMENT
मागील सात दिवसात एका कान, नाक, घसा तज्ज्ञाकडे 150 रूग्ण येत आहेत. मार्च मध्ये हे प्रमाण आठवड्याला 20 ते 30 केसेस इतके होते जे आता कमालीचे वाढले आहे.
बारामतीत ‘म्युकरमायकोसिस’चं मोठं संकट; आतापर्यंत 20 ते 25 रुग्णांची नोंद
कोरोनातील पहिल्या लाटेपेक्षा ह्या लाटेत काळी बुरशी रोगाचा संसर्ग अधिक आहे , कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण बारा झाल्यांनतर 15-20 दिवसांनी काळी बुरशीचा संसर्ग व्हायचा. आता मात्र हा संसर्ग कोरोना उपचार चालू असताना हि दिसतोय, तर काही रुग्णांमध्ये हा संसर्ग ४५ दिवसानंतरही आढळला आहे रुग्ण मयूर हे त्यातल्या त्यात सुदैवी ठरले. त्यांची सोमवार दिनांक १८ मे रोजी सकाळी काळ्या बुरशीसंबंधी शस्त्रक्रिया झाली त्यांना ७ मे रोजी कोरोना झाला व १४ मे ला ते कोरोनातून बरे झाले. पण त्यांना पुढे लगेच त्रास सुरु झाल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांच्यावर त्वरित उपचार झाले .
म्युकरमायकोसिस रोगाच्या बाबतीत प्रशासन याआधी खासगी व सरकारी रुग्णालयात एकूण रूग्णांची नोंद करत नव्हते , मात्र दोनच दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने सर्व खासगी व सरकारी रुग्णालय तसेच सर्व कोव्हिड सेंटरला काळी बुरशी संबंधित रूग्णांची माहिती देण्याचे पत्र दिले आहे. या नोंदीतून पुढच्या काळात या कोव्हिड पश्चात होणाऱ्या या रोगाचे वास्तव समोर येईल.
ADVERTISEMENT