मुंबईतल्या पालघरजवळ असणाऱ्या बोईसर या ठिकाणी राहणारी मेडिकल स्टुडंट सदिच्छा साने बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र तिचा काहीही शोध लागू शकलेला नाही. तसंच तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
ADVERTISEMENT
रत्नागिरीतल्या समुद्रात नौका बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवस संपर्क नाही
ज्या तरूणासोबत तिचा सेल्फी सापडला आहे त्या तरूणाचं म्हणणं आता समोर आलं आहे. मुंबईतल्या बँडस्टँड या भागातून ती बेपत्ता झाली आहे. 29 नोव्हेंबरच्या दिवशी सदिच्छा मेडिकलची प्रीलीम असल्याने गेली होती. ती अद्याप सापडू शकलेली नाही. सदिच्छा सानेचं अपहरण झालं असावं असा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
सदिच्छा सानेचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो आहे. त्याचप्रमाणे बांद्रा परिसरात तिचे फोटोही लावण्यात आले आहेत. सदिच्छाने तिला बॉयफ्रेंड आहे असं सांगितल्याचा दावा तिच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या तरूणाने केला आहे. सदिच्छा सानेसोबत मितू सिंह या तरूणाने सेल्फी काढला होता. मितू सिंह याने केलेला हा दावा सदिच्छाच्या कुटुंबीयांनी खोडून काढला आहे.
दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रीलिमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद आला असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. सदिच्छाच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे वांद्रे बॅंडस्टॅंड येथे दाखवण्यात येत आहे. त्या ठिकाणी तिला पाहणारा शेवटचा एक जीवरक्षक असल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
सेल्फी काढणाऱ्या मितू सिंहने काय म्हटलं आहे?
मितू सिंह हा मित्स किचन नावाचा फूड स्टॉल बँडस्टँड भागात चालवतो. त्याने सदिच्छासोबत सेल्फी काढला होता. तो आपल्या फूड स्टॉलवर येणाऱ्या लोकांसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करतो त्यामुळे त्याच्या दुकानाची प्रसिद्धी होते त्याने पोलिसांना हीच माहिती दिली. तसंच अनेक जणांसोबत काढलेले फोटोही दाखवले. वांद्रे पोलिसांनी मितू सिंहचे दोन्ही मोबाईल ताब्यात घेतले आहेत. ते बोईसर पोलिसांकडे पाठवल्याचीह माहिती समोर आली आहे. तसंच सदिच्छाच्या सगळ्या मित्र मैत्रिणींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
ADVERTISEMENT