मुंबईत एका बँक अधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याची पत्नी आणि मुलानेच हे भयंकर कृत्य केलं आहे. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागात ही घटना घडली आहे. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आईने आणि मुलाने या बँक अधिकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह सातव्या मजल्यावरून खाली फेकला. वडिलांनी आत्महत्या केली आहे असं दोघांनी भासवलं होतं. मात्र त्यांचा कावा उघड झाला. आंबोली पोलिसांनी या प्रकरणी या बँक अधिकाऱ्याच्या मुलाला आणि पत्नीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील सिडबी क्वार्टरमध्ये सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव संतनकुमार शेषाद्री (54 वर्षे) असं असल्याची माहिती समोर आली आहे. संतनकुमार शेषाद्री यांचा मृतदेह पाहून इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सुरुवातीला ही एक आत्महत्या असल्याचं वाटत होतं आणि त्यानुसार पोलीस तपास करत होते. मात्र, त्यांना तपासादरम्यान घरातील लादीवर आणि भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्या अँगलने आपला तपास सुरू केला.
Crime: मामी-भाच्याचे अनैतिक संबंध, भाच्याने केली मामाची निर्घृण हत्या
या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. संबंधित बँक अधिकाऱ्याच्या वागण्याला ते कंटाळले होते. हा बँक अधिकारी त्यांना खर्चासाठी पैसे देत नव्हता आणि लहान-लहान गोष्टींवरुन वाद घालत असे त्यामुळे या बँक अधिकाऱ्याच्या पत्नीने आणि मुलाने त्याला संपवलं आणि मृतदेह खाली फेकून दिला. तसंच ही आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या दोघांची पोलीस चौकशी करत आहेत. त्यानंतर त्यांना न्यायालयातही हजर केलं जाईल.
ADVERTISEMENT