मुंबईतल्या Haffkine Biopharma ला लस निर्मितीसाठी 159 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीद्वारे कोव्हॅक्सिन या लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. हाफकिनला भारत बायोटेककडून लस तयार करण्याची संमती मिळाली आहे त्यामुळे आता मुंबईतल्या परळ या ठिकाणी कोव्हॅक्सिन ही लस उत्पादित होऊ शकणार आहे. असं असलं तरीही ही लस मिळण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत वाट बघावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
हाफकिन बायोफार्मा कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कराराच्या अंतर्गत करणार आहे. हाफकिन आणि भारत बायोटेक यांच्यात यासंबंधी करार झाला आहे. दरम्यान हाफकिनला केंद्र आणि राज्य सरकारतर्फे निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारी संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हाफकिन बायोफार्मा या कंपनीला केंद्राकडून 65 कोटी आणि राज्य सरकारकडून 94 कोटींचा निधी असा एकूण 159 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Haffkineला कोव्हॅक्सिन लस उत्पादित करण्यास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
हाफकिन बायोफार्मचाचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी ही माहिती दिली की हाफकिन बायोफार्मा पुढच्या आठ महिन्यात युद्धपातळीवर लस निर्मितीसाठी काम करणार आहे. आम्ही आठ महिन्यांची मुदत यासाठी सरकारकडून घेतली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ सध्या जून महिना सुरू आहे आणि आणखी आठ महिने म्हणजेच 2022 च्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही लस मिळू शकणार आहे. त्यामुळे हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस निर्मितीसाठी 159 कोटींचा निधी मंजूर झाला असला तरीही प्रत्यक्षात हाफकिनने तयार केलेली लस बाजारात येण्यासाठी आठ महिन्यांचा अवधी लागणार आहे. म्हणजेच ही लस येण्यासाठी पुढचं वर्ष उजाडणार आहे ही बाब निश्चित आहे.
व्हॅक्सिन निर्मितीचे टप्पे
कोव्हॅक्सिन ही लस तयार करण्याचं काम दोन टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे. पहिला टप्पा ड्रग सबस्टान्सचा असेल आणि दुसरा टप्पा फायनल ड्रग प्रॉडक्टचा असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आम्हाला बायो सेफ्टी लेव्हल म्हणजेच BSL 3 ची गरज भासणार आहे. अशी माहिती डॉ. राठोड यांनी दिली. BSL 3 ही अशी सुविधा आहे जी व्हॅक्सिन तयार करताना दिली जाते असंही हाफकिन बायोफार्माने सांगितलं आहे.
122 वर्षे जुन्या असलेल्या हाफकिन इन्स्टिट्युटचा एक भाग म्हणजेच हाफकिन बायोफार्मा आहे. देशातल्या सर्वात जुन्या बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटपैकी ही एक आहे. रशियाचे bacteriologist Dr.Waldemar Haffkine यांच्या नावाने या ही संस्था सुरू आहे. प्लेगच्या साथीवर त्यांनी लस शोधली होती.
ADVERTISEMENT