ADVERTISEMENT
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचा आरोप केलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या गायब आहेत. सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले परमबीर सिंह सध्या गायब आहेत. मुंबई पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबईतील महानगर न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं आहे.
न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
न्यायालयाची नोटीस परमबीर सिंह यांच्या मुंबईतील घराच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे.
नोटीस दिल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत न्यायाधीशांसमोर अथवा संबंधित तपास अधिकाऱ्यासमोर हजर व्हावे असे आदेश नोटीसमध्ये देण्यात आलेले आहेत.
यापूर्वी परमबीर सिंह यांना मुंबई पोलिसांबरोबरच चांदीवाल आयोगाकडूनही नोटीस आणि समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, ते हजर झाले नाही. त्यामुळे या नोटिशीला सिंह काय प्रतिसाद देतात. हे पुढील काही दिवसांत दिसेल.
ADVERTISEMENT