Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा! रुग्णसंख्येत होतेय घट, 12 रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

• 03:01 PM • 20 Jan 2022

कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे चिंतेत असलेल्या मुंबईकरांना आता दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईत मात्र, कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं आशादायी चित्र आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५,७०८ रुग्ण आढळून आले. तर १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येबरोबरच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली होती. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव […]

Mumbaitak
follow google news

कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे चिंतेत असलेल्या मुंबईकरांना आता दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईत मात्र, कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं आशादायी चित्र आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५,७०८ रुग्ण आढळून आले. तर १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येबरोबरच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली होती. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यानं मुंबईत गेल्या आठवड्यात मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होऊ लागली आहे.

कोरोना लसीमुळे तयार झालेली इम्युनिटी किती दिवसानंतर कमी होते?; भारतात करण्यात आला अभ्यास

गेल्या २४ तासांत मुंबईत ५,७०८ कोरोना बाधित आढळून आले. तर १५ हजार ४४० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. म्हणजेच गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाण तिप्पट आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९६ टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत २२ हजार १०३ सक्रीय रुग्ण आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्यानं मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधीही लांबला आहे. हा कालावधी ८३ दिवसांवर गेला आहे. १७ जानेवारी रोजी रुग्णदुप्पटीचा कालावधी ५५ दिवस इतका होता. तर रिकव्हरी रेट ९३ टक्के इतका होता. त्यामुळे मुंबईतील कोरोना परिस्थिती सुधारत असल्याचं दिसत आहे.

Omicron Symptoms: ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर दिसून येेतात ही 20 लक्षणं

मुंबईत कालच्या तुलनेत आज कोविड चाचण्यांमध्ये घट झाली आहे. बुधवारी (१९ जानेवारी) मुंबईत ६० हजार २९१ चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर गेल्या २४ तासांत (२० जानेवारी) ५३ हजार २०१३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज मुंबईचा पॉझिटिव्ही रेट १०.७३ टक्के नोंदवण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांना लक्षणं नाहीत.

    follow whatsapp