दिल्लीत आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू असताना आर्थिक राजधानीत मात्र, कोरोना संसर्गाला ब्रेक लागल्याचं चित्र आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, गेल्या २४ तासांत दोन हजारांच्या आत रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील परिस्थिती सुधारतेय…
तिसऱ्या लाटेच्या शिरकावानंतर मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेकच बघायला मिळाला. सुरुवातीच्या दोन आठवड्यांत मुंबईत रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला. दिवसाला जवळपास २० हजारांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद मुंबईत तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीला झाली. मात्र, आता कोरोनाचा जोर ओसरताना दिसत आहे.
चिंतेची बाब ! अमरावतीत आढळले Omicron चे दोन सब-व्हेरिएंट
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत मुंबईत १,८५७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात १,५६० लक्षणं नसलेल्या रुग्णांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणंच नाहीत.
आज दिवसभरात २३४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, यापैकी ५८ जणांना ऑक्सिजन बेडवर भरती करण्यात आलं आहे. १०.२ टक्के बेड्सवर रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान २४ तासांत ५०३ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या २१,१४२ असून, रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका आहे.
ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये सर्वाधिक दिसतात ‘ही’ दोन लक्षणं, दुर्लक्ष मुळीच नको
मुंबईत दिवसभरात ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या १६,५४६ इतका झाला आहे. मुंबईत आज कोरोना चाचण्यां कमी करण्यात आल्या आहेत. २४ तासांत ३४ हजार ३०१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी १४४ दिवसांवर पोहोचला आहे.
…तर राज्यातील निर्बंध हटवणार; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
१० दहा दिवसांत आढळून आलेले रुग्ण (कंसात चाचण्या)
१५ जानेवारी – १०,६६१ (५४,५५८)
१६ जानेवारी – ७,८९५ (५७,५३४)
१७ जानेवारी – ५,९५६ (४७,५७४)
१८ जानेवारी – ६,१४९ (४७,७००)
१९ जानेवारी – ६,०३२ (६०,२९१)
२० जानेवारी – ५,७०८ (५३,२०३)
२१ जानेवारी – ५,००८ (५०,०३२)
२२ जानेवारी – ३,५६८ (४९,८९५)
२३ जानेवारी – २,५५० (४५,९९३)
२४ जानेवारी – १,८५७ (३४,३०१)
ADVERTISEMENT