Mumbai Crime : दिवाळीत फटाके फोडण्यावरून वाद, अल्पवयीन मुलांनी केली तरूणाची हत्या

मुंबई तक

25 Oct 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:03 AM)

काचेच्या बाटलीत फटाके फोडू नका असं एका तरूणाने सांगितल्याने तीन अल्पवयीन मुलांनी २१ वर्षीय तरूणाची हत्या केली. सोमवारी ही घटना घडली आहे. एकीकडे राज्यभरात दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी होत असताना मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतल्या गोवंडी भागात सोमवारी दुपारी ही घटना घडली ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ह्रदयद्रावक घटनेनं कल्याण हादरलं! आईची हत्या […]

Mumbaitak
follow google news

काचेच्या बाटलीत फटाके फोडू नका असं एका तरूणाने सांगितल्याने तीन अल्पवयीन मुलांनी २१ वर्षीय तरूणाची हत्या केली. सोमवारी ही घटना घडली आहे. एकीकडे राज्यभरात दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी होत असताना मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतल्या गोवंडी भागात सोमवारी दुपारी ही घटना घडली ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

ह्रदयद्रावक घटनेनं कल्याण हादरलं! आईची हत्या केली, आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेह पंख्याला लटकावला

सुनील शंकर नायडू असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव

सुनील शंकर नायडू असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. तो २१ वर्षांचा होता. गोवंडीतल्या शिवाजी नगर भागात असलेल्या म्हाडा कॉलनीत सुनील वास्तव्यास होता. दुपारी इमारतीबाहेर १२ वर्षांचा एक मुलगा फटाके उडवत होता. त्याने काही फटाके काचेच्या बाटलीत फोडले. हे पाहून सुनीलने त्याला सांगतिलं की बाटलीत फटाके फोडू नकोस असं केल्याने काचा इतरांना लागू शकतात.

१२ वर्षीय मुलाने आणखी दोघांना सोबत आणून युवकाला दिला चोप

१२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने सुनीलच्या बोलण्याचा राग मनात ठेवला. त्यानंतर त्याने त्याचा १५ वर्षांचा भाऊ आणि १४ वर्षांचा मित्र अशा दोघांना सोबत घेतलं. या तिघांनीही सुनीलला इमारतीजवळ गाठलं. तिथे त्याला या तिघांनीही मारहाण केली. एवढंच नाही तर यापैकी एका मुलाने त्याच्या मानेत चाकू खुपसला.

नेमकं काय झालं या सगळ्या घटनेत?

चाकू मारल्यानंतर सुनील या तिघांच्याही मागे धावला. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. इमारतीतले तीन जिने चढून तो गेला. परत खाली उतरत असताना तो जिन्यात कोसळून पडला. स्थानिकांनी त्याला राजावाडी रूग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तीन पैकी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर एकाचा शोध सुरू आहे.

    follow whatsapp