मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचासह सर्व आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
ADVERTISEMENT
कोर्टाच्या या निर्णयामुळे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना अशी आशा वाटत होती की, किमान आज तरी कोर्ट आर्यनला जामीन मंजूर करेल. पण तसं घडलेलं नाही. त्यामुळे आता खान कुटुंबीय पुढे नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय सुनावताना फक्त जामीन अर्ज नाकारल्याचं सांगितलं. कोर्टाकडून संपूर्ण ऑर्डर जारी होताच आर्यन आणि इतर आरोपींचे वकील हे जामीन अर्जासाठी मुंबई हायकोर्टात जातील.
14 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यानंतर आज (20 ऑक्टोबर) कोर्टाने निर्णय देताना आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान, आर्यन खानच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं होतं की, आर्यन ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं. तसंच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सापडलं नव्हतं. यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात यावं.
दुसरीकडे एनसीबीकडून असा आरोप करण्यात आला होता. की, आर्यन हा आंतरराष्ट्रीय ड्रग्स ट्रॅफिकमध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे या ड्रग पेडलरबाबत माहिती मिळविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात येत आहे. याशिवाय आर्यन खान हा संपूर्ण षडयंत्रात सहभागी आहे. अशा स्वरुपाचा युक्तिवाद करण्यात आला होता.
‘माझी प्रार्थना आहे की, आज आर्यन खानला जामीन मिळावा’, BJP आमदार राम कदम नेमकं काय म्हणाले?
आर्यन खान अटकेचं नेमकं प्रकरण काय?
आर्यन खान हा मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळावा म्हणून त्याचे वडील शाहरुख खान यांनी दिग्गज वकिलांची फौज कोर्टात उभी केली होती. मात्र, असं असलं तरीही आर्यनला अद्यापही जामीन मिळू शकलेला नाही.
काही दिवसांपूर्वी आर्यन खान याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून आर्यन हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच आहे. NCB ने ड्रग्स प्रकरणात ही कारवाई केली होती.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकून NCB ने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह इतरांना अटक केली होती. ज्यांना सुरुवातीला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी आर्यन खानच्या वकिलांनी सतीश मानेशिंदे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. याबाबत आतापर्यंत अनेक सुनावण्या पार पडल्या आहेत. पण आर्यनची अद्यापही सुटका होऊ शकलेली नाही.
एनसीबी देखील सातत्याने नवनवे दावे करुन आर्यनला ड्रग्स प्रकरणात जामीन मिळू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. दरम्यान, आर्यन खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर न झाल्याने तो हायकोर्टाकडे याबाबत दाद मागणार आहे.
ADVERTISEMENT