अपघात कधी आणि कसा होईल सांगता येत नाही. रस्त्यावर अपघात होणं आता नित्याचंच झालंय, पण मुंबईतील मालाड परिसरात घडलेली अपघाताची बातमी वाचून तुम्हाचाही विश्वास बसणार नाही. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना तरुणीकडून ‘ब्रेक’ ऐवजी ‘ॲक्सिलेटर’ दाबला गेला आणि कार थेट खाली कोसळली.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
मुंबईतील मालाड परिसरातील झकेरिया रोडवर जैन सन्स बिल्डिंगमधून (jainsons building) कार खाली कोसळल्याची ही घटना घडली. 22 वर्षीय अपेक्षा मिरानी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता hyundai verna कार बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये पार्क करण्याचा प्रयत्न करत होती.
आई-मुलाने वडिलांना संपवत मृतदेह सातव्या मजल्यावरून खाली फेकला; मुंबईत बँक अधिकाऱ्याची हत्या
कार पार्क करत असताना तरुणीने ‘ब्रेक’ ऐवजी चुकीने ‘ॲक्सिलेटर’ दाबला. त्यानंतर कार पार्किंग फ्लोअरवर असलेल्या काचा तोडून थेट खाली कोसळली. खाली पार्क करण्यात आलेल्या एका गाडीवर कार कोसळली. या घटनेत कारचं बरंच नुकसान झालं. मात्र, सुदैवाने 22 वर्षीय अपेक्षा मिरानी ही तरुणी थोडक्यात बचावली.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येही अशीच घटना घडली होती. टाटाच्या शोरुममध्ये कार घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून अशीच चूक झाली होती. टाटा टियागो कार घेऊन जात असताना व्यक्तीने ‘ब्रेक’ ऐवजी ‘ॲक्सिलेटर’ दाबला आणि कार पहिल्या फ्लोअरवरून खाली कोसळली. या घटनेत व्यक्तीला काही झालं नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालं होतं.
Viral Video: मुलाला साडीने बांधून 10व्या मजल्यावरून खाली लटकवलं, जन्मदात्या आईने असं का केलं?
बंगळुरूमध्येही महिंद्राच्या शोरुममध्ये Mahindra thar ला पहिल्या मजल्यावर अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. थार गाडी पहिल्या मजल्यावर असलेल्या शोरुमची गाडी तोडून खाली कोसळताना दिसत होतं. मात्र, रेलिंगवर कार अडकली.
ADVERTISEMENT