मुंबई मेट्रो वनची सेवेत 7 जूनपासून 30 टक्के अधिक असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोना काळात मेट्रोच्या प्रवाशांसाठी काही निर्बंध घालून दिले गेले आहेत. ज्यामध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्य याला मेट्रोने महत्त्व दिलं आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने घालून दिलेले सगळे नियम मुंबई मेट्रोने काटेकोरपणे पाळले आहेत. आता महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने जात असताना काही बदल मेट्रोनेही केले आहेत.
ADVERTISEMENT
येत्या सोमवारपासून म्हणजेच सात जूनपासून मुंबई मेट्रोच्या सेवेत 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. पिक अवर्स म्हणजेच गर्दीच्या वेळांमध्ये 10 मिनिटांनी एक मेट्रो आणि गर्दी नसणाऱ्या तासांमध्ये 15 मिनिटांनी एक मेट्रो असा महत्त्वाचा बदल या सेवेत करण्यात आला आहे. तसंच प्रवाशांच्या सोयीसाठी वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सोमवारपासून पहिली ट्रेन सकाळी 6.50 ला सुटेल आणि शेवटची ही ट्रेन ही घाटकोपरवरून रात्री 10.15 वाजता सुटेल. हा महत्त्वाचा बदल मेट्रोने केला आहे. एवढंच नाही तर ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिटं आधी स्टेशन्स सुरू होतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयामार्फत शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकचे नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. सोमवारपासून राज्यात अनलॉक जाहीर करण्यात आलं असून, रुग्णांचा पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषांवर जिल्हे ७ जून पासून अनलॉक करण्यात येणार आहेत. या दोन निकषांच्या आधारावर राज्य सरकारने जिल्ह्यांची गटवारी केली आहे.
मुंबई या गटवारीत तिसऱ्या टप्प्यात येत आहे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांचा पहिल्या गटात समावेश करण्यात आला असून या ठिकाणी लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे हे दोन जिल्हे तिसऱ्या गटात येत आहेत. त्यामुळे सरकारी नियमांनुसार या जिल्ह्यात लोकल प्रवास हा सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्य़क्ती करु शकणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
ADVERTISEMENT