मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ महापालिका प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे. एकीकडे महापालिका प्रशासन शहरात निर्बंध कडक करण्याचा विचार करत असताना मुंबईतील मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून मुंबई मेट्रो प्रशासन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर २८० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. याआधी घाटकोपर-वर्सोवा मार्गावर २५६ फेऱ्या चालवल्या जात होत्या. यामुळे मेट्रोच्या मार्गावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल असं मत मुंबई मेट्रोच्या प्रशासनाने व्यक्त केलंय.
ADVERTISEMENT
नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार: नितीन राऊत
कोरोना काळातही मुंबई मेट्रो मार्गावर (शनिवार-रविवार चा अपवाद वगळता) सध्या १ लाखापेक्षा जास्त प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. एरवी याच मार्गावर दररोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करायचे. घाटकोपर – वर्सोवा ही सध्या मुंबईत सुरु असलेली एकमेव मेट्रो सेवा आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो प्रशासन आरोग्यविषयक सर्व नियमांचं पालन करत आहे.
मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !
राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांच मेट्रो प्रशासन तंतोतंत पालन करत आहे. गर्दीच्या वेळी लोकांवर नियंत्रण ठेवण्यास कर्मचाऱ्यांच्या एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. लॉकडाउनपश्चात मुंबई मेट्रो पुन्हा एकदा धावायला लागल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही योग्य ती काळजी घेत असल्याचं मेट्रो प्रशासनाने सांगितलं.
प्रत्येक मेट्रो स्टेशनवर अशा प्रकारे घेतली जात आहे काळजी –
१) कोरोनाच्या सर्व नियमांचं योग्य रितीने पालन केलं जात आहे की नाही हे तपासण्यासाठी एक समिती कायम लक्ष ठेवून असते.
२) एन्ट्री पॉईंटवर हेल्थ डेस्ट आणि सॅनिटायजरची व्यवस्था. याचसोबत सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रिनींग
३) ठराविक वेळेनंतर सर्व गाड्यांची स्वच्छता व सॅनिटायजेशन केलं जातंय.
४) सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांना उभं राहण्यासाठी मार्किंगची सोय केली आहे.
५) कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्लास्टिक टोकन बंद. प्रवाशांनी डिजीटल तिकीट, स्मार्ट कार्ड आणि पेपर OR तिकीटांचा वापर करावा अशी विनंती
६) ट्रेनमअध्ये अल्टरनेटिव्ह सिटींग अरेंजमेंट
७) प्रवासादरम्यान सर्व प्रवासी मास्क घालत आहेत याची दक्षता घेतली जातेय.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार ! पेपरसाठी अर्धा तास वाढवला
ADVERTISEMENT