वरळीत Lift पडून ५ जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक

सौरभ वक्तानिया

• 08:07 AM • 25 Jul 2021

मुंबईच्या वरळी भागातील हनुमान गल्ली भागात शनिवारी ललित अंबिका बिल्डींगमध्ये लिफ्ट कोसळून ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली असून NM Joshi मार्ग पोलिसांनी या लिफ्टचा कंत्राटदार आणि सुपरवायजरला अटक केली आहे. दोघांवरही IPC च्या ३०४ (२) कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु असून या घटनेत आणखी […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या वरळी भागातील हनुमान गल्ली भागात शनिवारी ललित अंबिका बिल्डींगमध्ये लिफ्ट कोसळून ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली असून NM Joshi मार्ग पोलिसांनी या लिफ्टचा कंत्राटदार आणि सुपरवायजरला अटक केली आहे.

हे वाचलं का?

दोघांवरही IPC च्या ३०४ (२) कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु असून या घटनेत आणखी कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून बेपर्वाई झाल्याचं समोर आलं तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

ललित अंबिका या इमारतीचं बांधकाम अद्याप सुरु आहे. शनिवारी घडलेल्या अपघातात अविनाश दास, भारत मंडल, चिन्मय मंडल, एक अनोळखी पुरूष यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील दोघांची ओळख पटलेली नाही. लक्ष्मण मंडल हा व्यकी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी नायर रूग्णालयात नेण्यात आलं.

ज्या इमारतीची लिफ्ट कोसळली तिचं बांधकाम सुरू होतं. या ठिकाणी मल्टि स्टोअरी पार्किंगही बांधण्यात येत होतं. काही मजूर लिफ्टने ९ व्या मजल्यावरून खाली येत होते. त्यावेळीच हा अपघात झाला. या अपघातात चार जण जागेवरच ठार झाले. तर एकजण या लिफ्टमध्ये अडकला होता. या ठिकाणी आलेल्या अग्निशमन दलाने अडकलेल्या मजूराला बाहेर काढलं. तसंच या ठिकाणी बचावकार्यही सुरू केलं. यासाठी सुमारे दोन तास लागले.

    follow whatsapp