मुंबई : ट्रिटमेंटसाठी आलेल्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर शाररिक अत्याचार, फिजीओथेरपिस्टला अटक

मुंबई तक

• 12:33 PM • 24 Oct 2021

आपल्या क्लिनकमध्ये ट्रिटमेंटसाठी आलेल्या एका १६ वर्षीय दिव्यांग मुलीवर शाररिक अत्याचार करणाऱ्या फिजीओथेरपिस्टला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत मुलीला बोलता येत नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा घेत गेलं वर्षभर आरोपी या मुलीवर बलात्कार करत राहिला. परंतू अखेरीस हा त्रास सहन न झाल्यामुळे मुलीने आपल्या आई-वडिलांना मोबाईल मेसेजद्वारे […]

Mumbaitak
follow google news

आपल्या क्लिनकमध्ये ट्रिटमेंटसाठी आलेल्या एका १६ वर्षीय दिव्यांग मुलीवर शाररिक अत्याचार करणाऱ्या फिजीओथेरपिस्टला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत मुलीला बोलता येत नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा घेत गेलं वर्षभर आरोपी या मुलीवर बलात्कार करत राहिला.

हे वाचलं का?

परंतू अखेरीस हा त्रास सहन न झाल्यामुळे मुलीने आपल्या आई-वडिलांना मोबाईल मेसेजद्वारे आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. यानंतर मुलीच्या आई-वडिलांनाही धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांत आपली तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

आई-वडिलांचं भांडण सोडवायला गेलेल्या सावत्र मुलाचा कोयत्याने वार करत खून

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जेव्हा आपल्या आई-वडिलांसह ट्रिटमेंटसाठी क्लिनीकमध्ये जायची, त्यावेळी फिजीओथेरपिस्ट मुलीवर अत्याचार करायचा. आई-वडील क्लिनीकबाहेर थांबून रहायचे त्यामुळे त्यांना या गोष्टीचा पत्ताच लागला नाही. पोलिसांना या आरोपीने आणखी काही मुलींवर अशाच पद्धतीने अत्याचार केल्याची शंका आहे. दरम्यान आरोपीला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअतर्गत अटक करण्यात आली असून स्थानिक न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

    follow whatsapp