अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारी ठाण्यातील ती महिला कोण?

मुंबई तक

14 Sep 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:10 AM)

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला ठाणे शहरातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवरून वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी ही कारवाई केली. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला ठाणे शहरातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवरून वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी ही कारवाई केली.

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आहे. ती सातत्याने अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवरून आक्षेपार्ह पोस्ट करत होती. या प्रकरणी तक्रार पोलिसांना मिळाली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी सदरील महिलेला अटक केली.

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणारी महिला कोण?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या महिलेचं नाव स्मृती पांचाळ असं आहे. ती मागील दोन वर्षांपासून अमृता फडणवीस यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर आक्षेपार्ह कमेंट्स करत होती, अशी माहिती समोर आलीये.

अमृता फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची जीभ घसरली

स्मृती पांचाळचे फेसबुकवर अनेक बनावट अकाऊंट्स

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका टिप्पणी करणारी स्मृती पांचाळ ही बनावट अकाऊंट्सवरून हे करत होती. वेगवेगळ्या बनावट नावाने तिने अकाऊंट बनवले आहेत. स्मृती पांचाळ या महिलेने १३ जीमेल अकाऊंट्स तयार केलेले आहेत. त्यामाध्यमातून तिने फेसबुकवर तब्बल ५३ बनावट अकाऊंट्स बनले असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

पोलिसांनी मंगळवारी स्मृती पांचाळ या आरोपी महिलेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयाने आरोपी महिलेला (स्मृती पांचाळ) १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोक मामी म्हणतात हे ऐकून कसं वाटतं? अमृता फडणवीस म्हणतात…

स्मृती पांचाळ या महिलेने कोणत्या उद्देशाने फेसबुकवर ५३ अकाऊंट्स आणि १३ जीमेल खाती सुरू केली होती, याची चौकशी पोलीस करणार असल्याचं कळते. आरोपी महिलेविरोधात भारतीय दंड विधान कलम ४१९ आणि ४६८, तसेच आयटी कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp