मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचं आव्हान-हेमंत नगराळे

मुंबई तक

• 02:26 PM • 17 Mar 2021

मुंबई पोलीस खातं सध्या कठीण समस्येतून जातं आहे. ही कठीण समस्या सोडवण्यासाठीच माझी नियुक्ती करण्यात आली आहे. या समस्येमुळे मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतरच मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न मी करेन आणि मुंबई शहरात अधिकारी, कर्मचारी ते कॉन्स्टेबल दर्जापर्यत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई पोलीस खातं सध्या कठीण समस्येतून जातं आहे. ही कठीण समस्या सोडवण्यासाठीच माझी नियुक्ती करण्यात आली आहे. या समस्येमुळे मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतरच मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न मी करेन आणि मुंबई शहरात अधिकारी, कर्मचारी ते कॉन्स्टेबल दर्जापर्यत सगळ्यांचं सहकार्य मला हवं आहे. हे सहकार्य मला मिळेल याची खात्री आहे असं मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मागच्या काही दिवसांपासून जे काही आपण पाहतो आहे. पोलीस अधिकाऱ्याची अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग योग्य नाही. NIA आणि ATS या दोन्ही संस्थांकडे तपास सोपवण्यात आला आहे. योग्य तो तपास झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही नगराळे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

मागील काही दिवसांपासून आपण जे बघत आहात, ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्याचा तपास योग्य पद्धतीने NIA आणि एटीएसकडून करण्यात येतो आहे. तो तपास योग्य रितीने होईल याची मला खात्री आहे असंही हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं. मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यावर ते बोलत होते.

कोण आहेत हेमंत नगराळे?

१) हेमंत नगराळे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी

२) सहावीपर्यंत चंद्रपूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण, यानंतरचं शिक्षण नागपूरच्या पटवर्धन हायस्कुलमध्ये

३) VRCE नागपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी

४) याव्यतिरीक्त नगराळे यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. याव्यतिरीक्त नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पुरस्कार, आंतरिक सुरक्षा पदक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

१९८९ ते ९२ या काळात चंद्रपूरच्या नक्षल भागात नगराळे यांचं पहिलं पोस्टींग होतं. यानंतर १९९२ ते ९२ या काळात नगराळे सोलापूरमध्ये DCP या पदावर कार्यरत होते. बाबरी मशिदीच्या पतनानंतर सोलापूर शहरात दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात नगराळे यांचा मोठा वाटा मानला जातो. १९९४ ते १९९६ या काळात नगराळे रत्नागिरीमध्ये पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळातही नगराळे यांनी एन्रॉन प्रकल्पाशी संबंधित जमिन अधिग्रहाणाचे अनेक मुद्दे हाताळले होते. १९९६ ते ९८ या काळात हेमंत नगराळे यांनी CID विभागात अधिक्षक पदावर काम केलं. या काळात MPSC पेपर लिक, अंजनीबाई गावीत ने केलेलं लहान मुलांची हत्या ही प्रकरणं नगराळे यांनी हाताळली होती.

    follow whatsapp