mumbai pune expressway toll price hike : येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस (mumbai pune express way) हायवेवरील प्रवास महागणार आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागाकडून दर तीन वर्षांनी टोलच्या दरात (Toll Price Hike) 18 टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीचा फटका मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या अनेक नागरीकांना बसणार आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान नवीन दरानुसार चारचाकी,ट्रक आणि बसला नेमका किती टोल भरावा लागणार आहे, याची माहिती जाणून घेऊयात.(mumbai pune express way travel toll price hike from 1st april 2023)
ADVERTISEMENT
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून (mumbai pune express way) दररोज लाखो वाहने ये-जा करत असतात. या वाहनांमध्ये चारचाकी, टेम्पो, बस, ट्रक, थ्री एक्सल वाहन आणि एम एक्सल वाहनांचा समावेश असतो.या सर्व वाहनांना आता 1 एप्रिलपासून टोलच्या नवीन दरवाढीला (Toll Price Hike) सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गाच्या टोल मध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल २०२३ मध्ये टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय टोल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या टोल दरवाढीचा फटका वाहन धारकांना बसणार आहे.
हे ही वाचा : Savarkar row: शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!
‘या’ वाहनांना बसणार इतका टोल?
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या चार चाकी वाहनांना याआधी 270 रूपयांचा टोल भरावा लागायचा. मात्र 1 एप्रिलपासून त्यांना आता 320 रूपयांचा टोल भरावा लागणार आहे. तसेच टेम्पोला याआधी 420 इतका टोल भरावा लागायचा. मात्र 18 टक्के टोल दरवाढीनुसार त्यांना आता 495 रूपयांचा टोल भरावा (Toll Price Hike) लागणार आहे.
हायवेवरून प्रवास करणाऱ्या मालवाहू ट्रकला याआधी 580 टोल भरावा लागायचा. मात्र आता नवीन दरानुसार त्यांना 685 रूपये टोल भरावा लागणार आहे. तसेच बससाठी याआधी 797 रूपयांचा टोल भरावा लागायचा. मात्र दरवाढीमुळे आता 940 रूपये टोल भरावा लागणार आहे.
थ्री एक्सल वाहनांना सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर 1380 रूपये टोल भरावा लागतो. मात्र 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन दरानुसार 1630 रूपये टोल लागेल. यासोबतच एम एक्सल वाहनांसाठी याआधी 1835 रूपये टोल भरावा लागायचा. आता नवीन दरानुसार त्यांना 2165 रूपये टोल भरावा लागणार (Toll Price Hike) आहे.
हे ही वाचा : 6 कोटी लोकांसाठी गुडन्यूज! PF च्या व्याजदरात वाढ
टोलचे नवीन दर ?
चार चाकी वाहन
सध्याचे दर : 270
एप्रिल 2023 मधील दर : 320
टेम्पो
सध्याचे दर : 420
एप्रिल 2023 मधील दर : 495
ट्रक
सध्याचे दर : 580
एप्रिल 2023 मधील दर : 685
बस
सध्याचे दर : 797
एप्रिल 2023 मधील दर : 940
थ्री एक्सल वाहन
सध्याचे दर : 1380
एप्रिल 2023 मधील दर : 1630
एम एक्सल वाहन
सध्याचे दर : 1835
एप्रिल 2023 मधील दर : 2165
ADVERTISEMENT