लाइव्ह

Mumbai Rain News LIVE Updates: मुंबईत पावसाची दादागिरी! 'हे' रस्ते बंद

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 08:10 PM)

Mumbai Rain News LIVE Updates: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तर सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयीचे सर्व अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचा...

mumbai rain live update rain in mumbai rain news mumbai lake levels in Mumbai weather in mumbai 10 days rain in catchment area Mumbai rain situation in Mumbai tomorrow school holiday in mumbai due to rain mumbai water level mumbai rain warning

मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

follow google news

Mumbai Rain News LIVE Updates: मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये रविवारी (7 जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांसह, रेल्वे ट्रॅक जलमय झालेले आहेत. लोकल सेवा कोलमडल्या आहेत. तसंच, शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्य आणि हार्बर लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. गांधी मार्केट, कुर्ला, परळ परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. 

मुसळधार पाऊसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा पाऊस अडचणीचा ठरत आहे. लोक महापालिकेवर प्रचंड नाराज आहेत. 
 

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:11 PM • 08 Jul 2024
    मुंबईत पावसाची दादागिरी! 'हे' रस्ते बंद

    मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पावसामुळे अनेक मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. हे मार्ग कोणते आहेत. ते जाणून घ्या. 

    पाणी साचल्याने सक्कर पंचायत चौक शिवडी वडाळा वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. 

    पाणी साचल्याने दादर टी.टी वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.  प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

    इनकम टॅक्स ऑफिस येथे पावसाचे पाणी साचल्याने बीकेसी कनेक्टर कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

    कारच्या बिघाडामुळे वाशी ब्रिज उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

    पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान वाहतूकीचा मार्ग एस.व्हि रोडकडे वळविण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
     

  • 05:58 PM • 08 Jul 2024
    Mumbai Rain Updates : मुंबईत लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत!

    कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेवर ठाण्यापासून पुढे पाणी साचल्यामुळे ठप्प झालेली लोकल आता पुन्हा सुरू झाली असून या मार्गावरील स्लो आणि फास्ट, अप आणि डाऊन दिशेने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. 

     

  • 01:55 PM • 08 Jul 2024
    Mumbai rain live update : अतिमुसळधार कोसळणार

    हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे जिल्ह्यात अतिशय मुसळधार पाऊस पुढील काही तासांत कोसळू शकतो. 

    हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देताना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

    मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अतिशय मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
  • 01:47 PM • 08 Jul 2024
    Mumbai Rain Updates : मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद

    मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी हे ट्वीट वाचा...

     

     

  • 01:45 PM • 08 Jul 2024
    Mumbai Rain Updates : पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या कोणत्या एक्सप्रेस रद्द?

    पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द आहेत. 

     

  • 01:44 PM • 08 Jul 2024
    Mumbai Rain Updates : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी

    मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरु आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्याची माहिती आहे. कर्जत, कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू आहे.

     

follow whatsapp